Share

‘एक दिवस आपली पाखरे घरटे सोडून जाणार’; सुप्रिया पिळगांवकर यांनी दिली भावूक प्रतिकिया

Published On: 

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ मालिकेत  अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी उत्तम आईची भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांचे कौतुक करण्यात आले. सुप्रिया  खऱ्या आयुष्यात देखील एका मुलीची आहे. या रील आणि रियल लाईफमध्ये आईची भूमिका साकारताना काय अनुभव येतात याबाबत सुप्रिया पिळगांवकर यांनी सांगितले आहे.

सुप्रिया पिळगांवकर यांनी पडद्यावर आईची भूमिका करतानाचे त्यांचे मत  सांगितले आहे. त्या म्हणतात की, एक आई म्हणून ईश्वरी आपल्या मुलांवर सारखेच प्रेम करते, पण आपणा सर्वांना माहीतच आहे की, देवकडे तिचा विशेष कल आहे. आपल्या आणि आपल्या मुलाच्या नात्यात ती कोणालाच येऊ देत नाही. माझ्या मते, प्रेम आणि काळजी दाखवण्याची प्रत्येक आईची आपली खास पद्धत असते. शेवटी एका प्रत्येक आईची इच्छा अशीच असेत की, आपल्या मुलाने आनंदात असावे आणि जीवनात त्याची भरभराट व्हावी. देवबद्दल ईश्वरीला हेच वाटत असते.’ असे या मालिकेतील भूमिकेविषयी त्या म्हणाल्या.

https://www.instagram.com/p/COpdiyqj5-r/?utm_source=ig_embed&ig_rid=0ee8ccf2-7721-425c-8e58-099f349d6572

पुढे त्या म्हणाल्या की, ‘मला एक मुलगी आहे आणि तिने आई म्हणून माझी निवड केली याबद्दल मला कृतज्ञता वाटते. तिच्या बाबतीत मी खूप प्रोटेक्टिव्ह आहे. तिच्या जीवनात ती जे निर्णय घेते, त्यात मी तिच्यावर विश्वास ठेवते आणि तिला आधार देते. ती एक सुंदर आणि स्वतंत्र स्त्री झालेली पाहताना माझ्या मनाला खूप आनंद होतो. आपल्याला हे माहीत असते की एक ना एक दिवस आपली मुले पाखरासारखी घरट्यातून उडून जाणार आहेत, पण तरीही एका आईसाठी ती मुले नेहमीच जवळच्या असतात’, असे त्या रियल जीवनातील आईविषयी म्हणाल्या.

काही दिवसापूर्वीच  अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर सविता बजाज यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आल्या होत्या. सिंन्टाच्या मदतीने सुप्रिया पिळगांवकर यांनी सविता बजाज यांच्या उपचारादम्यानचा सगळा खर्च देत मदत केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!