Share

लसीकरणाचा एक दिवसाचा थाट, पालिकेकडे केवळ ४ हजारांचा साठा!

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने महानगरपालिकेने जम्बो लसीकरण मोहीम हाती घेतली. मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु झाले. ४५ प्लस, नंतर १ मे पासून १८ प्लस लसीकरण मोहिमही धूमधडाक्यात सुरु झाली. मात्र लसींच्या सततच्या तुटवड्यामुळे १० दिवसांमध्येच १८ प्लस मोहीम बारगळली. दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी केवळ लसीकरण सुरु ठेवण्यात आले होते.

आजपासून शासनाच्या नव्याने आलेल्या आदेशानुसार पुन्हा एकदा ४५ प्लस, फ्रंटलाईन वर्कर्सला पहिला डोस दिला जाणार आहे. मात्र विविध बूथवर केवळ चार हजार लसींचा साठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नवीन साठा कधीपर्यंत येईल हे सांगता येणार नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आल्याने पुन्हा सुरु झालेले लसीकरण एक दिवसाचाच थाट ठरणार आहे.

१६ जानेवारीपासून शहरात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सला लस देण्यात आली. त्यानंतर पुढच्या टप्प्यांमध्ये जेष्ठ नागरिक, ४५ प्लस नागरिकांना लस देण्यात आली. मात्र सुरुवातीला लसीबाबत जनजागृती नसल्याने लस घेणाऱ्यांचे प्रमाण नगण्य होते. मात्र जसजशी लसीबाबत जनजागृती होत गेली तसतशी नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. मनपाने तर जम्बो लसीकरण मोहिमच हाती घेतली.

१८ प्लस लसीकरणही १ मे पासून सुरू झाले होते. मात्र आता लसींच्या तुटवड्यामुळे गेल्या काही दिवसात लसीकरणात अनेक अडचणी येत आहेत. १२ मे पासून केवळ दुसरा डोस घेणाऱ्यांनाच प्राधान्य तर १८ ते ४४ वयोगटासाठी प्रथम डोसचे लसीकरण स्थगित करण्यात आले होते. आजपासून केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पत्रानुसार कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसेस मध्ये १२ ते १६ आठवड्याचे अंतर ठेवण्यात आले आहे. कोव्हॅक्सिन लसीच्या यापूर्वीच्या सूचनांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!