मुंबई : सोनी ट्विव्ही वरील प्रसिद्ध शो ‘द कपिल शर्मा शो’ हा नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अग्रेसर असतो. या कार्यक्रमातील सर्व कलाकारांना देशभरात चागंली ओळख मिळाली आहे. या कार्यक्रमात पहिल्या हंगामापासुन भूमिका करत असलेल्या सुमोन चक्रवर्तीने एक पोस्ट करत तिच्या एका आजाराविषयी माहिती दिली आहे.
सुमोनाने तिच्या इंस्टाग्रामवर काही दिवसापुर्वी एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये सुमोन वर्कआउट लूकमध्ये दिसली. या फोटोत तिच्या चेहऱ्यावर खुप थकवा दिसत आहे. या पोस्टमध्ये तिने लिहीले आहे की,’खुप दिवसानंतर भरपुर व्यायाम केल्याने मला बरे वाटत आहे. सध्या मी बेरोजगार जरी असले तरी मी सक्षम आहे कुटूंबाची काळजी घ्यायला. गेल्या दहा वर्षापासुन म्हणजे २०११ पासुन मला एंडोमेट्रिओसिस हा आजार झाला आहे.’ असा खुलासा तिने केला.
https://www.instagram.com/p/CO2oRLArOdf/
या पोस्टमध्ये ती पुढे लिहीते की,’ती या आजाराच्या आता चौथ्या टप्प्यात पोहोचली आहे. या आजारपणात माझ्यासाठी खाण्य़पिण्याच्या सवयी, व्यायाम आणि कोणत्याही प्रकारचा ताण न घेणे गरजेचे आहे असे म्हणाली. मात्र लॉकडाउन काळात मानसीकदृष्ट्या टिकणे कठीण आहे.’ असे ती म्हणाली. तीच्या या पोस्टनंतर तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या आहे.
महत्वाच्या बातम्या
- इंदापूरला नेण्यात येणारे पाणी रद्द करा;अन्यथा…; नारायण पाटलांचा निर्वाणीचा इशारा
- ‘श्रीमंतीची झिंग’ सांगणाऱ्या ‘कंदिल’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
- पोलिसांचे पथसंचलन! लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलीस करणार कडक अंबलबजावणी
- ‘गलती उन्ही से होती है…’ मोदी सरकारवर टिकेनंतर अनुपम खेर यांनी घेतला यु टर्न
- ठाण्यात दरोडा टाकून औरंगाबादेत वास्तव्यास राहणारा मोक्कातील आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात


