Share

फेसबुकवर जवळीक साधत तरुणाने केला विवाहितेचा विनयभंग

Published On: 

औरंंगाबाद : फेसबुकवर ओळख झालेल्या मित्राशी जवळीक साधल्यानंतर एकांतात काढलेले अर्धनग्न फोटो मैत्रिण सासरी गेल्यानंतर सोशल मिडिआवर अपलोड करणा-या युवकाविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकुंदवाडी परिसरात राहणा-या पीडित तरूणीचा विवाह २०१२ मध्ये नांदगाव तालुक्यातील एका मुलासोबत झाला होता. पीडितेचा नवरा काही कामधंदा करत नसल्याने पती पत्नीचा वाद होऊन ती विवाहिता २०१८ मध्ये सासरी मुकुंदवाडी येथे आली होती. या दरम्यान विवाहितेची फेसबुकवरून आक्षय वानखेडे (रा. महालक्ष्मी कॉलनी मुकुंदवाडी) याच्या सोबत झाली होती. ओळखीचे रुपांतर मैत्रित झाले होते.

त्यानंतर अक्षय वानखेडेने पीडितेसोबत जवळीक करीत तिच्यासोबत अर्धनग्न अवस्थेत फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढले होते. याचदरम्यान अक्षयने पीडितेचे फेसबुक अकाऊंटचा आयडी व पासवर्ड मिळवला होता.२०१९ मध्ये पीडिता सासरी नांदायला गेल्यानंतर अक्षय याने तिच्या मोबाईल नंबरवर कॉल करून तिला धमकविणे सुरू केले. तु माझ्याशी फोनवर बोलत जा. मी बोलविन तेव्हा औरंगाबादला येत जा तू नाही आलीस तर तुझे सगळे फोटो सोशल मिडियावर अपलोड करीन अशी धमकी देणे सुरू केले.

दरम्यान, अक्षय वानखेडे याने पीडितेचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो इस्ट्राग्रामवर तसेच फेसबुकवर अपलोड करून तीची बदनामी करण्यास सुरूवात केली. पीडितेचे हे फोटो सासरच्या मंडळीने बघीतल्यावर त्यांनी पीडितेला माहेरी आणून सोडले. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून अक्षय वानखेडे विरुद्ध बदनामी केल्याचा तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!