नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केंद्र आणि राज्य सरकारांची चिंता वाढली आहे. देशातल्या कोरोना स्थितीचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेत आढावा घेतली. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. गावागावात जा, घरोघरी जा आणि कोरोनाच्या टेस्ट करा, असे आदेश देतानाच अनेक राज्यांकडून व्हेंटिलेटरचा वापर केला जात नसल्याबद्दल मोदींनी नाराजीही व्यक्त केली.
आरटी-पीसीआर आणि रॅपिड टेस्टची संख्या वाढवण्यात यावी. कोणत्याही दबावाशिवाय राज्यांनी कोरोना रुग्णांची संख्या दाखवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा, असंही मोदी म्हणाले. घरोघरी जाऊन कोरोनाची चाचणी करा. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा वाढवा. आवश्यकता भासल्यास अंगवाडी सेवकांनाही सोबत घेण्यास त्यांनी सांगितलं. ग्रामस्थांना गृहविलगीकरणाचे नियम सोप्या आणि समजेल अशा भाषेत समजावून सांगा, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
देशात कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. मार्चच्या सुरुवातीला सुमारे 50 लाख चाचण्या करण्यात येत होत्या. आता जवळपास 1.3 कोटी चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मोदींना दिली. तसेच पॉझिटिव्हिटी रेट घटत असून रिकव्हरी रेट वाढत असल्याचंही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी म्हटलंय की केंद्र सरकारकडून राज्यांना दिल्या गेलेल्या व्हेंटीलेटर्सचा वापर आणि सध्यस्थितीबाबतचे ऑडीट त्वरित केलं पाहिजे. एका अधिकृत वक्तव्यात म्हटलं गेलंय की, काही राज्यांमध्ये पुरवलेले व्हेंटीलेटर्स स्टोअरेजमध्येच पडून राहण्याच्या बातम्यांना गंभीरपणे घेतलं गेलं आहे तसेच असा आदेश दिला गेलाय की, केंद्र सरकार द्वारे दिले गेलेल्या व्हेंटीलेटर्सचे इन्स्टॉलेशन आणि ऑपरेटींग याचं तातडीने ऑडीट केलं जावं. पुढे पंतप्रधानांनी म्हटलंय की, जर आवश्यक असेल तर आरोग्य कर्मचार्यांना व्हेंटीलेटर्स योग्य प्रकारे वापरण्याचे प्रशिक्षण द्यायला हवं. असे मत देखील यावेळी त्यांनी मांडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- इंदापूरला नेण्यात येणारे पाणी रद्द करा;अन्यथा…; नारायण पाटलांचा निर्वाणीचा इशारा
- जगनमोहन रेड्डींचा जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या खासदाराला अटक
- ये पब्लिक है, सब जानती है! देवेंद्र फडणवीस यांचे आता थेट सोनिया गांधींना पत्र
- ‘लसीकरण बंद करण्याबाबतचे आरोग्यमंत्र्यांचे ‘ते’ विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस’
- ‘पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जे नियोजन करायला हवे होते ते केले नाही’


