करमाळा : उजनी धरणावरील भीमा प्रकल्प व इतर विविध योजनांच्या पाणी वापराचा तपशील पाहिल्यास उजनीतून आता नवीन प्रस्तावांना मंजुरी देऊन पाणी देणे हि बाब करमाळा तालूक्यासह सोलापुर जिल्ह्यावर अन्याय करणारी आहे. इंदापुरला नियोजित उपसा सिंचन योजनेस पाणी देणे बाबतचा निर्णय तातडीने रद्द करा अन्यथा मराठवाड्यासाठी उजनीतुन चालू असलेल्या कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेचे काम बंद पाडण्यात येईल, असा इशारा माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे.
प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकात याबाबत त्यांनी स्पष्ट केले आहे कि उजनीतील उपलब्ध पाणी व प्रत्यक्ष मंजुर योजनेंचे एकुण पाणी याचा विचार केला असता आता उजनीतुन एक थेंबही पाणी इतरत्र देण्यासारखी परिस्थिती नाही. महामंडळाच्या आकडेवारी (टिएमसी) नुसार भीमा प्रकल्प प्रवाही क्षेत्र ( 34.51) खाजगी उपसा क्षेत्र (7.63) सीना-माढा उपसा (4.75) भीमा-सीना जोडकालवा (3.15) दहिगाव उपसा (1.81),शिरापुर उपसा (1.73),आष्टी उपसा (1) बार्शी उपसा (2.59),एकरुख उपसा (3.16),सांगोला उपसा (2),लाकडी-निंबोडी प्रस्तावित (0.57),मंगळवेढा उपसा (1.01),कृष्णा-मराठवाडा (17.98), आष्टी (बीड साठी राखीव 5.68) असे पाणी वाटप नियोजन असुन यातील मराठवाड्यासाठी काम चालू आहे तर बीड जिल्ह्यातील आष्टीसाठी पाणी मंजुरी आहे.
दर वर्षी उन्हाळी तीन चार महिन्यांचा व वर्षभराच्या उन्हाचा विचार केल्यास 14.68 टिएमसी पाण्याचे तर बाष्फीभवन म्हणजे वाफ होते आहे. तर उजनीवरुन पिण्यासाठी 2.49 टिएसी पाण्याचा वापर होतो. तसेच औद्योगिक साठी 3.26 टिएमसी पाणी वापरले जाते. धरणाचा एकुण पाणीसाठा 117 टिएसी असुन गाळ मोठ्या प्रमाणावर आहे. मृतसाठा हा 63.66 टिएमसी इतका आहे. एकुण पाणी नियोजन 84.30 टिएमसी आणि प्रत्यक्ष गाळ आणि मृतसाठा आणि बाष्पीभवन याचा विचार केल्यास पाणी वापर व मंजुरी याचा ताळमेळ कुठेच बसत नसुन आता नवीन प्रकल्पाना मंजुरी देणे म्हणजे मुळ नियोजन विस्कळीत करुन सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व योजनांवर गंभीर परिणाम करणारे असेच आहे.
शासनाने अधिकारी व प्रत्यक्ष शेतकरी,प्रकल्पग्रस्त यांचेसह कार्यस्थळावर येऊन पाहणी करावी. गणिती आकडेमोडीत पाणी शिल्लक दाखवून सांडपाणी हा शब्दप्रयोग करुन सर्वांची दिशाभुल करु नये. अन्यथा मराठवाड्याला पाणी जाणार नाही. शेतकऱ्यांच्या मध्ये पाटबंधारे विभागाने आपल्याला विश्वासात घेतले नसल्याबाबत प्रचंड रोष असुन या रोषाचे आंदोलनात रुपांतर होऊन कृष्णा-मराठवाडा बोगद्याचे काम बंद पडेल, असा इशाराही नारायण पाटील यांनी दिला आहे.
कृष्णा-मराठवाडा योजनेसाठी 17.98 टिएमसी पाणी मंजुर असुन बोगद्याचे काम चालू आहे. हि योजना मंजूर करत असताना कृष्णेतुन नीरेत व नीरेतुन भीमा नदीत पाणी सोडून मराठवाड्यास पाणी नेले जाईल असे सांगितले जात होते. कुठ आहे कृष्णेचे पाणी भीमेत? उलट उजनीच्या मृतसाठ्यातुनच हे पाणी जाणार आहे. सुरवातीस फक्त 7 टिएमसी पाणी मंजूर करणार असे सांगून आता 17.98 टिएमसी पाणी मंजुर करुन घेतले. अरे! कितीवेळा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फसवणार? आता मात्र मराठवाड्यासच काय पण भविष्यात बेकायदेशीर व मुळ पाणीवाटपात नसलेला एक थेंबही उजनीतुन उचलू देणार नाही असे देखील ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देश फक्त 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंगांच्या हाती द्या’
- जगनमोहन रेड्डींचा जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या खासदाराला अटक
- ये पब्लिक है, सब जानती है! देवेंद्र फडणवीस यांचे आता थेट सोनिया गांधींना पत्र
- ‘लसीकरण बंद करण्याबाबतचे आरोग्यमंत्र्यांचे ‘ते’ विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस’
- ‘पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जे नियोजन करायला हवे होते ते केले नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

