Share

‘एक दिवस भाजप रस्त्याने चालणाऱ्या माणसावर सुद्धा ईडीची कारवाई करेल’, शिवसेनेचा टोला

Published On: 

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सतत महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाना साधला आहे. आघाडी सरकारमधील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यात किरीट सोमय्या यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. दरम्यान सोमय्या यांच्यावर शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी निशाना साधला आहे.

मनीषा कायंदे यांनी किरीट सोमय्या यांचा पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये किरीट सोमय्या पत्रकारांवर शिरजोडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावरूनच मनीषा कायंदे यांनी ‘YZ सुरक्षा मिळाली म्हणजे पत्रकारांवर डाफरण्याचा अधिकार मिळतो का? असा सवाल करीत मला वाटते एक दिवस भाजपचे नेते रस्त्याने चालणाऱ्या सामान्य माणसावर सुद्धा ईडीची कारवाई करतील. असा खोचक टोला मनीषा कायंदे यांनी लगावला आहे.

https://twitter.com/KayandeDr/status/1443995945297846275

दरम्यान किरीट सोमय्या यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब तसेच छगन भुजबळ या नेत्यांवर भ्रष्टाचाराचा दावा करत सतत महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या विरुद्ध ठाकरे सरकार असा संघर्ष आता पहावयास मिळतो आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!