Share

जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत दाखल

Published On: 

जालना : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळं जालना ते दादर धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेद दाखल होत आहे. येत्या १४ फ्रेब्रुवारीपासून जनशताब्दी एक्स्प्रेस जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईपर्यंत सुधारित वेळेनुसार धावणार आहे.

जालना ते मुंबई धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २३ मार्च २०२० पासून बंद करण्यात आली होती. ही एक्सप्रेस पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. जालना येथून जनशताब्दी एक्स्प्रेस गाडी क्रमांक ०२२७२ सकाळी ८.३० वाजता निघून औरंगाबादला ९.२० वाजता पोहोचेल. मनमाडला सकाळी ११.२० ला पोहोचेल. नाशिक येथे दुपारी १२.२३, इगतपुरी दुपारी १.१५, कल्याण दुपारी ३.०९ वा. पोहोचेल. त्यानंतर ठाणे दुपारी ३.३१, दादर ३.५८, तर सीएसटीला दुपारी ४.२० वाजता पोहोचेल.

दरम्यान, मुंबईहून येताना छत्रपती शिवाजी टर्मिनसहून गाडी क्रमांक ०२२७१ दुपारी १२.१० वाजता निघेल. नाशिकला दुपारी ३.४४ वा. पोहोचेल. मनमाडला दुपारी ४.५० वाजता, औरंगाबादला सायंकाळी ६.३५ वाजता, तर जालना येथे सायंकाळी ७.४५ वाजता पोहोचेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!