Share

खिशातील बिड्यांच्या ‘क्लू’मुळे पोलिसांना सापडला मारेकरी

Published On: 

जालना : आरोपीच्या खिशात आढळलेल्या बिड्यांवरून जालना पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली आहे. मंठा रोडवरील चौधरीनगरच्या बाजूला असलेल्या जंगलात मंगळवारी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेचा जमिनीच्या वादातून भावानेच खून केल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. घटनास्थळी मिळालेला बिडीचा तुकडा आणि आरोपीच्या खिशात असलेल्या त्याच बिड्यांमुळे चंदनझिरा डीबी पथकातील पोलिसांना ‘क्ल्यू’ मिळाला आणि काही तासांतच पोलिसांनी आरोपीला गजाआड केले.

कमलबाई शाहूराव कोल्हे असे मृत महिलेचे नाव असून दीपक पटेकर असे आरोपीचे नाव आहे. जमिनीच्या वादातून दिपकने बहिणीचा खून केल्याचे समोर आले आहे. मृत महिला ही मुंबईला राहते. मात्र, कोर्टात तारीख असल्यामुळे चंदनझिरा भागात असलेल्या नातेवाइकांकडे गेली होती. तिला आरोपी भाऊ त्या ठिकाणी येऊन भेटला. दरम्यान, संबंधीत महिला मिळून न आल्याने काही नातेवाईकांनी मिसिंग झाल्याची तक्रार नोंदवली होती.

दरम्यान, मंठा रोडवरील चौधरीनगरच्या मागे महिलेचा मृतदेह दिसून आल्याने एका मजुराने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ फिंगर प्रिंट तज्ञ, श्वान पथकासह घटनास्थळ गाठले आणि घटनास्थळी असलेले पुरावे गोळा करून तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेह आढळलेल्या त्या महिलेचे फोटो नातेवाईकांना दाखवल्यानंतर तिची ओळख पटली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!