औरंगाबाद : जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) चे व्यवस्थापन पूर्वव्रत जलसंपदा विभाग विभागाकडे देण्यात यावे अशी मागणी, आमदार अंबादास दानवे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. वाल्मी ने चाळीस वर्षात एक लाख ६० हजार अभियंते आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. देशातील १४ वाल्मी पैकी औरंगाबाद वाल्मी पहिल्या क्रमांकावर ओळखले जाते.
दरम्यान, यासंदर्भात बोलताना आमदार अंबादास दानवे म्हणाले की, जलसंपदा विभागाच्या दुर्लक्षामुळे वर्षभरात ८० पैकी फक्त २४ कोर्स पूर्ण झाले. उर्वरीत ५६ कोर्स रद्द करण्याची नामुष्की वाल्मीवर आली आहे. वाल्मी संस्था महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. वाल्मीची पुनर्रचना करून जगाच्या बरोबर राहण्यासाठी नवनवीन अभ्यासक्रम, तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे, अशी भूमिका आमदार दानवेंनी माडली आहे.
दरम्यान, मराठवाड्याच्या पाणी अभ्यासासाठी आणि त्यावर भूमिका घेण्यासाठी वाल्मी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याविषयी जातीने लक्ष घालावे आणि वाल्मीची पुनर्रचना करून पूर्ववत जलसंपदा विभागाकडे वाल्मीचे व्यवस्थापन द्यावे, अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मराठवाड्यासाठी स्वतंत्र रॅपिड रेस्क्यू युनिट मिळावे – आमदार दानवे
मराठवाड्यासाठी स्वतंत्र रॅपिड रेस्क्यू युनिट मिळावे यासाठी आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. या विषयी माहिती देत अलीकडच्या काळात मराठवाड्यात बिबटे आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात संघर्ष वाढला आहे बिबट्याच्या हल्ल्यामुळे जीवित हानी देखील झालेली आहे. अशा परिस्थितीत वनविभागाकडे आवश्यक सुविधा नसल्यामुळे कर्मचारी प्राणाची बाजी लावून हे प्राणी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडतात. मात्र त्यासाठी पुरेशी साधने असलेली प्रशिक्षित टीम कार्यान्वयित नसल्याने शेतकरी वर्गाला याचा जास्त त्रास होतो अशी जनावरे पकडण्यासाठी अन्य जिल्ह्यातून टीम बोलवावी लागते सदरील परिस्थितीचा सारासार विचार करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने संभाजीनगर व नांदेड जिल्ह्यातील किनवट भागासाठी अशा रेस्क्यू टीम ची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
जालन्यातील सिडकोचे प्रकल्प रद्द करू नये; आमदार अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- ‘पत्रकारांना देशद्रोहाच्या वधस्तंभावर चढविण्याची तयारी सुरू आहे’
- भारतीय संघासाठी आनंदाची बातमी; अक्षर पटेल दुसऱ्या कसोटीसाठी फिट
- “इंग्लंड आणि भारत यांच्यातील टेस्ट सिरिजचं नाव तेंडुलकर-कुक ठेवलं जावं”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

