Share

जालन्यातील सिडकोचे प्रकल्प रद्द करू नये; आमदार अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील सिडको चे प्रकल्प रद्द करू नये, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. नियोजित मौजे खरपुडी येथील सिडको प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश चंद्र यांनी प्रकल्पास आर्थिक कारण दाखवून सिडको बोर्डाच्या ठराव घेऊन रद्द करण्याची शिफारस शासनाकडे केली आहे. त्यामुळे जालना शहराजवळ सिडकोचा गृहप्रकल्प पुन्हा एकदा गुंडाळला जाण्याची शक्यता आहे.

याविषयी आमदार दानवे यांनी सांगितले की, औरंगाबाद येथील वाळूज महानगर २ व ३ , वाळूज महानगर २ व ४ , जालना येथील मौजे खरपुडी येथील प्रकल्प सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक योगेश चंद्र यांनी प्रकल्पास आर्थिक कारण दाखवून सिडको बोर्डाच्या ठराव घेऊन रद्द करण्याची शिफारस शासनाकडे केली. प्रत्यक्षात जिल्ह्यात पंचतारांकित औद्योगिक नगरीत नवनवीन उद्योग धंदे येण्याच्या मार्गावर आहेत. अनेक उद्योग सुरू झालेले आहेत. सिडकोच्या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होते. याकरता औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील सिडको चे प्रकल्प रद्द न होण्याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे.

सिडको गृहप्रकल्प उभारणीचा पहिला प्रयत्न बारगळला

वाढत्या शहरातील घरांची गरज पाहून २००८ मध्ये नागेवाडी व दरेगाव परिसरातील ४७० हेक्टरवर शंभर टक्के भूसंपादनाद्वारे घरांचा प्रकल्प विकसित करण्याचे सिडकोने ठरवले होते. यासाठी ३८ कोटींचा निधीही जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करवून दिला होता. मात्र, तत्कालीन लोकप्रतिनिधींनी हा प्रकल्प औद्योगिक क्षेत्रापासून एक किलोमीटर दूर नेण्याची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाला स्थगिती देऊन, अहवाल मागितला. दरम्यान, केंद्रीय पर्यावरण विभागाच्या निर्देशानुसार औद्योगिक वसाहतीमधील स्टील उद्योगांच्या भोवती एक किलोमीटर हरितपट्टा ठेवणे बंधनकारक असल्याने अधिसूचित क्षेत्रातील ४२ टक्के भाग बाधित होतो आणि उच्चदाब विद्युतवाहिन्या, नाला, खदानी इत्यादीमुळे १८ टक्के भाग बाधित होत असल्याने गृहप्रकल्पांसाठी फक्त ४० टक्के क्षेत्रच शिल्लक राहत असल्याचे अहवालात म्हटले होते. त्यानंतर सिडकोचा जालना शहराजवळ गृहप्रकल्प उभारणीचा पहिला प्रयत्न बारगळला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!