🕒 1 min read
जालना : पाहेगाव येथील शिवसैनिक माजी सरपंच रमेश शेळके यांच्या हत्या प्रकरणाचा खुलासा करण्यात पोलिसांना यश आले आहे. रमेश शेळकेंच्या खूनाची सुपारी त्यांच्या भावानेच दिल्याचे तपासात समोर आले आहे. खून करणाऱ्या आरोपींनी आधी दारू पाजली, नंतर गळा आवळत डोक्यावर दगड विटांनी वार केले. यानंतर कारमध्ये बसवून, वरून रॉकेल, पेट्रोल टाकून ती पेटवून देत कार दरीत लोटून दिल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. अर्जुन बाबासाहेब दांडाईत, अभिमन्यू अर्जुन दांडाईत, अशी आरोपी बाप-लेकांची नावे आहेत. या प्रकरणी मृत रमेश शेळके यांचा सख्खा भाऊ आणि त्याच्या एका मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत रमेश शेळके यांचा मोठा भाऊ रामप्रसाद शेळके आणि त्याची पत्नी दोन मुलांसह इतर एकूण 9 जणांविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
८ फेब्रुवारी रोजी सेवली-पाहेगाव रस्त्यावरील एका खोल दरीत कारमध्ये जळालेल्या अवस्थेत रमेश शेळके यांचा मृतदेह आढळला होता. घटनास्थळी पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी भेट देऊन गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार मृत रमेश शेळके यांचे आरोपी असलेला मोठा भाऊ रामप्रसाद शेळके याच्या विरोधात वडिलोपार्जित जमिनीचा वाद होता. हे प्रकरण 2018 पासून न्यायालयात प्रलंबित आहे. प्रकरण न्याय प्रविष्ट असताना दोन्ही भावांमध्ये खटके उडत होते. त्यामुळे पोलिसांनी कॉल डिटेल्स आणि संशयावरून आरोपी ताब्यात घेतले. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या गुन्ह्यातील आरोपी अर्जुन बाबासाहेब दांडाईत, अभिमन्यू अर्जून दांडाईत या बापलेकाला ब्राह्मणखेडा गावातून अटक करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मायदेशातील पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक दणका !
- ‘राजकीय कुरघोडीसाठी इतका करंटेपणा कुठून येत असेल?’
- जयसिद्धेश्वर यांच्या अडचणीत वाढ; खासदारकी धोक्यात !
- कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण
- ट्विटरला दणका देणारे स्वदेशी ‘Koo’ ऍप नेमके आहे तरी काय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
