Share

सहा बोटं असलेल्यांचाही घसा सुकतोय’ भर कार्यक्रमात कंगणाने लगावला हृतिकला टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कंगना अनेकदा हृतिकवर निशाणा साधताना दिसते. सध्या ती ‘लॉक अप’ या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे या शोमध्येही तिने हृतिकला टोमणा मारण्याची संधी सोडली नाही. कंगनाचा एक क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती हृतिकला टोला लगावताना दिसत आहे. ‘लॉक अप’च्या प्रीमिअर एपिसोडमधला हा क्लिप असून या शोने गेल्या काही दिवसांत प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. कंगना या शोची सूत्रसंचालक असून वीकेंडच्या एपिसोडमध्ये ती सेलिब्रिटी स्पर्धकांशी गप्पा मारताना दिसते. माझ्या या नव्या शोमुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे, असं ती व्हायरल व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतेय.

https://www.instagram.com/reel/Ca6sXsGlTkl/?utm_medium=copy_link

‘जे लोक माझ्याशी पाच वर्षांपासून बोलत नव्हते, त्या लोकांचे मला आता फोन येऊ लागले आहेत, ते मला भेटवस्तू पाठवत आहेत. कंगनाचं मन राखून ठेऊयात, नाहीतर आत जाऊन ती आमची पोलखोल करेल, असा त्यांचा त्यामागचा विचार आहे. लोकं पाच बोटं जोडून हात जोडत आहेत. तसं तर सहा बोटं असलेल्या लोकांचाही घसा सुकतोय’, अशा शब्दांत तिने हृतिकला टोला लगावला आहे. कंगनाच्या या वाक्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘सर्वांत वाईट एक्स गर्लफ्रेंडचा पुरस्कार कंगनाला द्यायला हवा’, असं एकाने म्हटलंय. तर ‘हे कंगनाच करू शकते,’ असं दुसऱ्याने लिहिलं आहे.
हृतिक आणि कंगना सुरुवातीला चांगले मित्र होते. मात्र या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर हृतिकने कंगनावर काही आरोप केले. कंगनाने सतत ईमेल पाठवून त्रास दिल्याचा आरोप हृतिकने केला. 2016 मध्ये हृतिकने कंगनाला कायदेशीर नोटीसही बजावली होती. हे प्रकरण सायबर सेलकडून सीआययुकडे वर्ग करण्यात आलं आहे. याप्रकरणी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हृतिकने मुंबई क्राईम ब्रांचकडे आपला जबाब नोंदवला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!