मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर केला. राज्याच्या विकासाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्याच्या आगामी विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प मांडला आहे. गेली दोन वर्ष वेगवेगळ्या संकटांना तोंड देत, राज्याचा विकास पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजचा हा अर्थसंकल्प विकासाच्या दिशेने टाकलेलं पुढचं पाऊल आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, मी ठामपणे सांगू इच्छितो राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प हा आपल्या सर्वांच्या साक्षीने जनतेसाठी, आपल्या राज्यातील सर्व माता, भगिणींचा विकास करणारा आणि त्यांना आधार देणारा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
“देवेंद्र फडणवीस १०-२० पवार खिशात घालून फिरतात”, गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान
अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कंपनीविरोधात ‘अर्शद वारसी’ असं काय बोलला की….
कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांच्या स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणार – अजित पवार
VIDEO: धोनी पुन्हा मेंटॉरच्या भूमिकेत ‘या’ अंडर १९ स्टारला शिकवत आहे ‘हेलिकॉप्टर शॉट’!


