मुंबई: वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात सादर केला. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल, अशा घोषणा आज विधिमंडळात केल्या गेल्या.
यामध्ये एक महत्त्वाची घोषणा म्हणजे भुविकास बँकांचे 34 हजार 788 कर्जदार शेतकऱ्यांकडे असणारे 964 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. तसेच भूविकास बँकांच्या जमिनींचा, इमारतींचा वापर यापुढे शासकीय योजनांसाठी केला जाणार असल्याचे देखील सांगितले.
राज्यातील वेगवेगळ्या जिल्हा भूविकास बँकांनी 1998 पासूनच नवीन कर्जवाटप बंद केलं आहे. यापूर्वीचे तब्बल 946 कोटी रुपयांची अनेक वर्षांपासून थकीत आहे. ही थकबाकी वाढून आता तब्बल 964 कोटींवर पोहोचली आहे. ही थकबाकी माफ करत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

