औरंगाबाद : १४ एप्रिल पासून लागू झालेल्या कडक निर्बंधांच्या धर्तीवर राज्यातील सुमारे पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे तर राज्यातील बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल. अशी घोषणा १३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. लॉकडाऊनचा तिसरा दिवस उजाडला तरी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत पोहोचलेली नाही. रिक्षाचालक, पथविक्रेते मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे आयटक संलग्न पथविक्रेता, रिक्षा तथा घरेलु कामगार युनियनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकार्यांमार्फत तसेच मुख्यमंत्री पोर्टलवर निवेदन पाठवले आहे.
औरंगाबाद शहरात १ लाखांपेक्षा जास्त फेरीवाले आहेत त्यातील पी एम स्वनिधीत फक्त चार हजार फेरीवाल्यांना कर्ज मंजुर झाले. त्यातील १६०० फेरीवाल्यांना प्रत्यक्ष कर्ज मिळाले. फेरीवाल्यांना दहा हजार रुपये महिना मदत करा अशी अनेक संघटनांची मागणी होती. तसेच १५ दिवसांचा लाॅकडाऊन लावला तर पाच हजार द्यायला हवे होते. १५०० रुपये अतिशय अपुरे आहेत. १५ दिवस नागरिक उपाशी राहु नये असा उद्देश असेल तर लाॅकडाऊन लागण्यापूर्वी त्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला हवी होती. अशीही मागणी विविध संघटनांकडून होत आहे.
१३ एप्रिल रोजी मुख्यसचिव सीताराम कुंटे याच्या सहीने निघालेल्या लॉकडाऊन तथा ब्रेक द चेन आदेशात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचा उल्लेख नाही म्हणून तातडीने संबंधित यंञनेला लेखी आदेश द्यावेत व लेखी आदेश देण्यापुर्वी काही सुचनांचा विचार करावा असे निवेदन देण्यात आले. यामध्ये आयटक संलग्न शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन, आयटक संलग्न लाल बावटा रिक्षाचालक युनियन आणि आयटकसंलग्न घरेलु कामगार मोलकरीन संघटनेतर्फे ई सुचना करण्यात आल्या. या निवेदनावर अॅड. कॉ. अभय टाकसाळ, किरणराज पंडित, भालचंद्र चौधरी इत्यादींच्या सह्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण ; पंतप्रधान मोदींनी बोलावली तातडीची बैठक
- ट्विटरची टिव टिव थांबली, तांत्रिक अडचणीमुळे सेवा काही काळासाठी ठप्प
- मुंबईत आता वाहनांसाठी ‘कलर कोड सिस्टम’ पोलीस आयुक्तांच्या सूचना
- लॉकडाऊन, कोरोनाचा रेल्वेला आर्थिक फटका! उत्पन्नात तब्बल ‘इतक्या’ कोटींची घट
- ‘कोरोना नाहीच, पैशासाठी बिल गेट्सच्या डोक्यातील ही कल्पना’, बंडातात्या कराडकर यांचा दावा


