मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने रौद्ररुप धारण केले आहे. देशात दररोज १ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. वाढत्या कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी सरकारडून कडक निबंध देखील लागू केलेले आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार पासून राज्यभरात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत जीवनावश्यक वस्तू वगळता उर्वरित दुकानेही बंद ठेवण्याचा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे.
परंतु हे सर्व निर्बंध लागू करून देखील रस्त्यांवर गर्दी दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. संचारबंदीच्या काळातही विनाकारण घराबाहेर पडून आणि रस्त्यावर वाहतूक कोंडी करणाऱ्या मुंबईकरांवर आता पोलिस कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. उद्यापासून मुंबईत खासगी वाहनांसाठी कलरकोड सिस्टम लागू होणार आहे. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हि माहिती दिली आहे. कलर कोड सिस्टमनुसार वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या गाड्यांसाठी लाल रंगाचं वर्तुळ लावणं बंधनकारक असेल.
भाजीपाल्याच्या गाड्यांसाठी हिरव्या रंगाचं तर इतर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी पिवळ्या रंगाचं वर्तुळ असणं अनिवार्य करण्यात आलंय. मुंबईत होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी हा खबरदारीचा उपाय अंमलात आणण्याचं ठरवलंय. दरम्यान, कलरकोडचा गैरवापर केल्यास ४१९ कलमाखाली गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लॉकडाऊन, कोरोनाचा रेल्वेला आर्थिक फटका! उत्पन्नात तब्बल ‘इतक्या’ कोटींची घट
- शिवभोजनाचा ‘सामना’ करण्यासाठी नांदेड भाजपचाही मोफत डबा
- ‘जावयाला ड्रग्स प्रकरणी एनसीबीने अटक केली म्हणून मलिकांचा केंद्रावर राग’
- लाल किल्ला हिंसाचार : दीप सिद्धूला जामीन मंजूर, ‘या’ अटींची करावी लागणार पूर्तता
- चंद्र, मंगळ पिधान युती आज सायंकाळी पहायला मिळणार! एक अद्भुत खगोलीय घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

