मुंबई : जगभरात प्रसिद्ध असलेली मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरला आज भारतात अडचण आली आहे. ट्विटर काही काळासाठी बंद झाले आहे. काल शुक्रवारी इतर देशात अशी अडचण निर्माण झाली होती. पण आज भारतातील युझर्सना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लवकरच ही अडचण दूर होईल असे ट्विटरतर्फे सांगण्यात आले आहे.
काल शुक्रवारी सायंकाळी अमेरिका वगळता इतर देशात ट्विटर बंद पडले होते. परंतू काही तासांनी ट्विटरची सेवा पूर्ववत सुरू झाली. पण भारतात आज याचा परिणाम जाणवत आहे. दुपारपासून ट्विटर बंद झाले आहे. वापरकर्त्यांना लॉग इन करताना अडचण येत आहे. त्यामुळे अनेकांनी त्रागा व्यक्त केला आहे.
शुक्रवारी जगभरातील युजर्सना ट्विटरवर अडचण येत होती. सायंकाळी सहा वाजेपासून ट्विटरवर तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. तसे ट्विट युजर्सनी केले आहेत. प्रामुख्याने युरोपातील काही देशात ही अडचण निर्माण झाली होती. परंतू काही तासात ही सेवा पुन्हा सुरळीत झाली. मात्र अजूनही काही ठिकाणी युजर्सना अडचणी येत असल्याची तक्रार आहे.
आज शनिवारी सकाळी सहा वाजता ट्विटर डाऊन झाले होते. त्यानंतर दुपारी १२ च्या नंतरही अडचण येऊ लागली. अखेर सायंकाळी चारच्या नंतर ट्विटर पूर्णपणे बंद पडले आहे. दरम्यान, लवकरच ट्विटरची सेवा सुरू होईल अशी माहिती ट्विटरकडून देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोरोना नाहीच, पैशासाठी बिल गेट्सच्या डोक्यातील ही कल्पना’, बंडातात्या कराडकर यांचा दावा
- धक्कादायक! कोरोना वार्डात ऑक्सिजन संपले, दुसरीकडे नेताना महिला रुग्णाचा मृत्यू
- नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांवर खा.हिना गावित संतापल्या!
- रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री, मेडिकल चालकाविरोधात पोलिसांत तक्रार
- ‘प्रसिद्धीसाठी काही लोकांकडून रेमडेसिवीरचे वाटप’, धनंजय मुंडेंवर पंकजांचा निशाणा


