Share

लॉकडाऊन, कोरोनाचा रेल्वेला आर्थिक फटका! उत्पन्नात तब्बल ‘इतक्या’ कोटींची घट

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता रेल्वे सेवेला देखील ब्रेक लागला होता. परंतु प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी सध्या केवळ आरक्षित रेल्वे नांदेड विभागातून धावत आहे. कोरोना नसतांना २०१९-२० चा वर्षभराचा रेल्वे प्रवासी अहवाल पाहिला तर प्रवाशी संख्या प्रतिदिन १ लाख १० हजार तर होतीच परंतु याशिवाय प्रतिदिन १४२ अनारक्षित आणि आरक्षित रेल्वे प्रतिदिन धावत होत्या. त्यात २०१९ मध्ये रेल्वेला जवळपास ३७० कोटी रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळाले होते. तर सध्या हे प्रमाण ७० कोटीवर आल्याने रेल्वे उत्पन्नात देखील घट झाली आहे.

अनारक्षित रेल्वे मात्र बंद असल्याने आणि कोरोनाचे सावट असल्याने त्याचा फटका रेल्वे उत्पन्नाला बसला आहे. कोरोना नसतांना २०१९-२० चा प्रवाशांचा अहवाल पाहिला तर एका दिवसांत तब्बल १ लाख १० हजार प्रवाशी नांदेड विभागाअंतर्गत धावणाऱ्या रेल्वेतून प्रवास करत होते. परंतु आता केवळ आरक्षित रेल्वे धावत असल्याने प्रवाशी संख्येत घट झाली असून दररोज केवळ साडे सात हजार प्रवाशी सध्या प्रवास करत आहेत.

मार्च महिन्यात कोरोनाचे आगमन झाले आणि २२ मार्च पासून लॉकडाऊन करण्याची वेळ आली. त्याचा परिणाम २२ मार्च पासून रेल्वेला ब्रेक लागला. हा ब्रेक १ जून पर्यत कायम होता. त्यामुळे एकही प्रवाशी रेल्वे धावली नाही. केवळ परप्रांतीय प्रवाशांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे धावल्या होत्या.

१ जूनपासून ते आजपर्यत धावलेल्या रेल्वे मध्ये हळूहळू बऱ्याच रेल्वे सोडण्यात आल्या.  नांदेड विभागातून सध्या ८० रेल्वे धावत आहेत. मात्र त्याही रेल्वे पूर्णतः आरक्षित आहेत. आरक्षित तिकीट धारकांना रेल्वे प्रवास दिला जात नाही. अनारक्षित रेल्वे बंद असल्याने सध्या केवळ प्रतिदिन साडे सात हजार प्रवाशी प्रवास करत आहेत.

४३ अनारक्षित रेल्वे धावत होत्या

सध्या केवळ आरक्षित रेल्वे धावत आहेत. त्यात अनारक्षित तिकीट धारकांना अजूनही अनारक्षित रेल्वेची प्रतीक्षा लागून आहे. अनारक्षित रेल्वे केव्हा सुरू होणार असा देखील प्रश्न काही प्रवाशांकडून उपस्थित केला जात होता. मात्र अजूनही केवळ आरक्षित रेल्वे धावत आहेत. कोरोना नसताना याआधी प्रतिदिन ४३ अनारक्षित रेल्वे धावत होत्या. ज्या की आता त्यांना ब्रेक लागल्याने रेल्वे प्रवाशी आणि रेल्वे उत्पन्नात घट झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!