Share

‘कोरोना नाहीच, पैशासाठी बिल गेट्सच्या डोक्यातील ही कल्पना’, बंडातात्या कराडकर यांचा दावा

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह महाराष्ट्रात विविध उपाययोजना करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांची दमछाक होत आहे. अख्ख्या जगातील संशोधक, तज्ज्ञ मंडळी कोरोनावर संशोधन करत आहेत. पण काही लोकांना कोरोनाचा संसर्ग म्हणजे पोरखेळ वाटत आहे. त्यामुळे तर्कहिन विधाने करून संभ्रम निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय.

कोरोनाचे संकट गडद झाले असतानाच वारकरी संप्रदायातील ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी अजब दावा केला आहे. कोरोना हा व्हायरस नसून केवळ दहशत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. शिवाय अमेरिकेतील अब्जोपती बिल गेट्स यांनी पैसे कमावण्यासाठी कोरोनाची कल्पना राबवल्याचे दावा कराडकर यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना केला आहे.

बंडातात्या कराडकर म्हणाले की, ‘गेले वर्षभर कोरोनाचा खेळ खेळणारे सरकार आता कोरोना लस घेण्यासाठी परत एकदा कोरोनाची लाट आल्याचे नाटक करून भारतीयांची फसवणूक करून लुटत आहे. कोरोनाची कल्पना बिल गेट्सच्या डोक्यातून निर्माण झाली असून भारतासह अनेक देश बिल गेट्सची खेळणी आहेत. जगातील अनेक तज्ञ ओरडून सांगत आहेत. तरीही लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा चालू आहे. त्यामुळे पुन्हा वायरस नसून दहशत आहे.

भारतात प्रतिवर्षी कॅन्सरने मरणाऱ्या रुग्णांची संख्या सरकारी माहितीनुसार साडेसात ते आठ लाख आहे. दारू पिऊन मरणाऱ्यांची संख्या अडीच लाख आहे, असे असताना फक्त बनावट कोरोनाने मारणाऱ्या रुग्णांची संख्या वाढवून सांगितली जाते. तंबाखू व तंबाखूजन्य व अन्य मादक पदार्थाचे उत्पादन, विक्री व सेवनावर कोणतेही बंधन नाही. यावरून सरकार दांभिक आहे, हे सिद्ध होते.

कोरोनाला नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाची लक्षणे ताप, थंडी, सर्दी, कफ, खोकला असे सामान्य लक्षणे असून तो जीवघेणा रोग नाही. (मुळात कोरोनाच नाही) यावर आयुर्वेदात शेकडो उपाय आहेत. पण सरकार हे उपाय यांना प्राधान्य देत नाही. कारण ही औषधे बिल गेट्सची नाहीत.

सरकारला नागरिकांना लुटून बिल गेट्सची सेवा करायची आहे. म्हणून लॉकडाऊनचे नाटक चालू आहे. यातून जनतेचा उद्रेक झाला तर ती क्रांती असेल व झाला नाही तर दुसऱ्या पारतंत्र्याची नांदी असेल’, असेही बंडातात्या कराडकर यांनी यांनी म्हटले आहे. माझे हे वैयक्तिक परखड मत असून यास कुठलाही सांप्रदाय व संघटना जबाबदार नाही असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना दिले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!