Share

पूजा चव्हाण प्रकरणावर उदयनराजे पहिल्यांदा झाले व्यक्त, म्हणाले..

Published On: 

मुंबई : चुकीचे काम केले असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मग शिक्षा करणारा उदयनराजे का असेना, अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाजप नेते उदयनराजे यांनी आपले मौन सोडले आहे. त्यांनी आज राज ठाकरे यांची मुंबईतील ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली.

उदयनराजे भोसले यांनी कौटुंबीक विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी राज यांची भेट घेतली. यावेळी दरम्यान छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज ठाकरेंना यांना राजमुद्रा भेट दिली. उदयनराजे हे पहिल्यांदाच ‘कृष्णकुंज’वर गेले होते. याबद्दल राज यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सन्मान केला. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली.

यावेळी उदयनराजे यांनी पूजा चव्हाण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकशाहीत सर्व निवडून दिलेले आमदार, खासदार आहेत. सर्वांनी जबाबदारीने वागायला आणि काम करायला हवे. प्रत्येकाने नैतिक जबाबदारीने वागणे गरजेचं आहे. कायद्यात सर्व समान आहेत. चुकीचं केलं असेल तर शासन व्हायलाच हवे. उदयनराजे असले तरी शिक्षा व्हायलाच हवी अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!