औरंगाबाद : कोरोना संसर्गाची तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक राहील अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाद्वारे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. १८ वर्षांखालील मुलांमध्ये काही लक्षणे आहेत का यासाठी शिक्षकांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शिक्षकांनी सर्वेक्षणावेळी १८ वर्षांखाली मुलांत काही लक्षणे जाणवत आहेत का याची नोंद घ्यावी. तसेच कुटुंबियांनी दक्ष राहुन मुलांची काळजी घेण्याच्या सुचना देण्यात याव्यात असे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांनी सांगितले.
राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे मोठे परिणाम दिसून येत आहे. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात शहरी भागातच दिसून येत होता. परंतु आता दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात रुग्णसंख्येसह कोरोना बाधितांच्या मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत विविध उपाय योजना करण्यात येत आहे. त्यानुसार सर्वेक्षणासाठी आशा वर्कर्स आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांची मदत घेतली जात आहे.
याबरोबरच गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांसह, मयत रुग्णांचा ऑनलाईन भरण्यात येणाऱ्या माहीतीचा आढावा घ्यावा. तसेच आयएलआय सर्वेक्षणात आढळलेल्या संशयीत किती तपासणीसाठी गेले. किती तपासणीसाठी गेले नाहीत तसेच किती त्यापैकी बाधित आढळले. याची माहीती व्हाट्सअपच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रला पाठवावी. नोंदी भरल्या जाताहेत का आणि फिल्डवर काम करणाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद घ्यावी असे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांचे आदेश आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- सोशल मीडियावर ओळखीनंतर तरूणीवर अत्याचार! पीडितेची दोन लाख रूपयांची फसवणूक
- शॉक लागल्याने मजूराचा मृत्यू, बांधकामाच्या ठिकाणी भिंतीचे प्लास्टर करताना घडली घटना
- ऑक्सिजन प्रेशर घटल्याने, मेल्ट्रॉनमधील आठ गंभीर रुग्णांना इतरत्र हलवले!
- शिरूर कासार येथील राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण; रुग्णांची रुग्णालयाला जाताना गैरसोय
- बंदुकीचा धाक दाखवून व्हिडीओ क्लीप व्हायरल, दोघे गजाआड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

