जालना: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ दिवसेंदिवस होत असल्याने जिल्ह्यात तसेच येथील ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच कोरोनाची लागण आपल्याला हौ नये या साठी नागरिकांचा लस घेण्यासाठी चांगलं प्रतिसाद असल्याचे दिसत आहे. मात्र आता अनेक ठिकाणी लस उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांचे लसीकरण झाले नाही. मंठा येथे पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना आता दुसऱ्या डोस साठी वात बघत बसावी लागत आहे.
मंठा तालुक्यात मागील काही दिवसापासून कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसीचा मुबलक प्रमाणात पुरवठा होत नसल्याने लसीकरण अनेकदा थांबवावे लागते किंवा संथ गतीने सुरू असते. दुसरीकडे तालुक्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत लसीकरणाला गती देण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून लसीचा मुबलक पुरवठा होणे गरजेचे आहे.
सध्या मंठा तालुक्यात १८ ते ४४ वयोगटासाठी कोवॅक्सिन ही पहिली लस देण्यात येत आहे. परंतू ४५ वर्षापुढील नागरिकांना कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेकांना ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर चकरा मारून देखील लस मिळत नाही अशी परिस्थिती आहे. मंठा तालुक्यात १२ ते १३ लसीकरण केंद्रावर ४५ वर्षापुढील नागरिकांना कोविशिल्ड ही लस दिली जात आहे परंतू उपलब्ध लस कमी असल्यामुळे अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.
मंठा ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मागील सहा दिवसापासून कोवॅक्सिन लस देण्यात येत आहे. तालुक्यात आता पर्यंत एकुण १७४४९ जणांना लस दिली आहे त्यात १४९७१ जणांना पहिला डोस तर २४७८ जणांना दुसरा डोस देण्यात आला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान लस मिळणार असल्याची बातमी पसरताच लसीकरण केंद्रावर गर्दी होत असल्याने येथे सुद्धा कोरोनाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. अशावेळी लसीकरण केंद्रावर फिजिकल डिस्टन्स पाळण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या
- सोशल मीडियावर ओळखीनंतर तरूणीवर अत्याचार! पीडितेची दोन लाख रूपयांची फसवणूक‘
- शॉक लागल्याने मजूराचा मृत्यू, बांधकामाच्या ठिकाणी भिंतीचे प्लास्टर करताना घडली घटना
- ऑक्सिजन प्रेशर घटल्याने, मेल्ट्रॉनमधील आठ गंभीर रुग्णांना इतरत्र हलवले!
- शिरूर कासार येथील राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण; रुग्णांची रुग्णालयाला जाताना गैरसोय
- बंदुकीचा धाक दाखवून व्हिडीओ क्लीप व्हायरल, दोघे गजाआड


