औरंंगाबाद : एमआयडीसी वाळूज परिसरातील बजाजनगर येथील २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करत दोन लाखांची फसवणूक करणार्या रोहन राजेंद्र खाजेकर (वय २८, रा. रामनगर मुकुंदवाडी, औरंगाबाद) याच्या विरोधात वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखाल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहे. तिची औरंगाबाद येथील खाजेकरसोबत दोन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली. पुढे रोहन खाजेकर भेटण्यासाठी मुंबईला गेला. नंतर औरंगाबाद येथील प्रोझोन मॉलमध्येही दोघांची भेट झाली होती. लग्नाचे आमिष दाखवून तो पीडितेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत होता. मात्र, तिने नकार दिला. दरम्यान, पीडित युवती मार्च महिन्यात बजाजनगर येथील घरी असताना मला डबा दे असे म्हणून रोहन खाजेकर हा पीडितेच्या घरी गेला होता. त्यावेळी पीडिता एकटीच होती. याचा फायदा घेऊन रोहन खाजेकर याने तिच्यावर बलात्कार केला. पुढे मुलीने त्याच्याशी संपर्क साधला असता आरोपीने बोलण्यास व लग्न करण्यास नकार दिला.
दरम्यान, रोहन खाजेकरने २०१९ मध्ये पीडितेच्या मोबाइलवर फोन करून आपल्या आईसोबत तिचे बोलणे करून दिले होते. त्यावेळी खाजेकरच्या आईने पीडितेला सांगितले की, तू मुंबईत जॉब करत आहे. लग्न झाल्यानंतर संसारासाठी पैसे लागणार असल्याने तू दर महिन्याला माझ्या मुलाकडे पैसे पाठवत जा. त्यावर पीडितेने महिंद्रा कोटक बँकेच्या अकाउंटवरून दर महिन्याला दहा ते बारा हजार रुपये पाठवण्यास सुरुवात केली. साधारणत: दोन लाख रुपये मुलाच्या खात्यावर पाठवूनही खाजेकर लग्न करण्यास तयार नसल्याचा उल्लेख पीडितेने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मला टीम इंडियाचा अभिमान’ ; रवी शास्त्री यांनी केले भारतीय संघाचे अभिनंदन
- सोशल मीडियासाठी काढलेल्या ६ कोटी रुपयांच्या कंत्राटावर अजित पवारांचे मोठे भाष्य,म्हणाले…
- ‘केंद्राने महाराष्ट्रात पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा’, काँग्रेसचा आरोप
- …तर त्यांना बाजूला घेऊन नाराजी सांगेन; कथित नाराजी नाट्यावर अजितदादांच खटक्यावर बोट !
- ठरलं ! स्पुटनिक व्ही लसीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

