औरंंगाबाद : पडेगावातील एका बांधकामाच्या ठिकाणी भिंतीचे प्लास्टर करताना इलेक्ट्रिक शॉक लागल्याने मजूराचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. गणेश शिवाजी झिलमेवाड (वय ४०, रा. देवळाई रोड, सातारा परिसर) असे त्याचे नाव आहे.
पडेगावातील मिरानगर भागात एका घराच्या बांधकाम ठिकाणी झिलमेवाड हे दुस-या मजल्यावर प्लास्टरचे काम करत होते. त्यावेळी डाव्या हाताला एका वायरचा शॉक लागल्याने झिलमेवाड गंभीर जखमी झाले.
हा प्रकार घडताच त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद छावणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. झिलमेवाड यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार सुधाकर पाटील करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘मला टीम इंडियाचा अभिमान’ ; रवी शास्त्री यांनी केले भारतीय संघाचे अभिनंदन
- सोशल मीडियासाठी काढलेल्या ६ कोटी रुपयांच्या कंत्राटावर अजित पवारांचे मोठे भाष्य,म्हणाले…
- ‘केंद्राने महाराष्ट्रात पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा’, काँग्रेसचा आरोप
- …तर त्यांना बाजूला घेऊन नाराजी सांगेन; कथित नाराजी नाट्यावर अजितदादांच खटक्यावर बोट !
- ठरलं ! स्पुटनिक व्ही लसीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

