मुंबई :देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलने शंभरी पार केली असली तरी कंपन्यांकडून दरवाढीचा सपाटा सुरुच आहे. दिवसेदिवस पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ होत आहे. एक लिटर पेट्रोलचा भाव आत १०० रुपयांच्या पुढे गेला आहे. असे असताना मात्र डोंबिवलीत चक्क १ रुपयात पेट्रोल दिले जात आहे.
महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत शिवसेना नेत्याने आजच्या दिवशी अनोख्या पद्धतीने आदित्य ठाकरेंचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं आहे. शिवसेना नेते योगेश म्हात्रे यांनी डोंबिवलीत १ रुपयात पेट्रोल देणार असल्याचं सांगितलं आहे. डोंबिवलीतील एमआयडीसी पेट्रोल पंपावर सकाळी दहा ते बारा या वेळेत नागरिकांना १ रुपयात पेट्रोल दिलं जाणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशातील बहुतांश राज्यांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. त्याचा परिणाम उद्योगावर झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. पेट्रोल, डिझेलवरील करातून केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळत असतो. या महसूलासाठीच केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप होत आहे. तर पेट्रोल दरवाढी बाबत आंदोलन करुनही केंद्र सरकार या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्यामुळे आजच्या दिवशी जनतेला थोडासा दिलासा देण्यासाठी हा उपक्रम राबवत असल्याचं योगेश म्हात्रे यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- श्रीलंका दौऱ्यात धवनला कर्णधारपद दिल्याने ‘हा’ माजी क्रिकेटपटू नाराज
- ‘खतरों के खिलाडीमध्ये जा’; फोटो पाहून चाहत्यांचा रसिकाला सल्ला
- ‘वारकऱ्यांच्या प्रस्तावाचा विचार झाला असता तर..’, शासनाच्या निर्णयावरून खडसेंची खंत
- कोहली करणार बॉलिंग? ; बीसीसीआयने प्रॅक्टिसचा व्हिडीओ शेअर करताच सोशल मीडियावर चर्चा
- अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
