Share

शहरात पुन्हा वाहनचोरांनी काढले डोके वर! बुलेटसह चार दुचाकी लांबवल्या

Published On: 

औरंंगाबाद : वाहन चोरट्यांनी शहर परिसरात धुमाकुळ घातला असून, पुन्हा डोके वर काढत शहराच्या विविध भागातून एका बुलेटसह चार दुचाकी लंपास केल्या आहेत. राजू नामदेव पवार (वय ४५,रा.सातारा तांडा) यांची बुलेट क्रमांक (एमएच-२०-ईए-३९८९) चोरट्याने १५ जून रोजी घराजवळून चोरून नेली.

दुसऱ्या घटनेत वैभव महादेव लिंगे (वय २५,रा.भवानीनगर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीयू-२०४४) चोरट्याने २५ मे रोजी एमजीएम दवाखान्याच्या पार्कींगमधुन चोरून नेली. तिसNया घटनेत, रविंद्र मारूती रावण (वय ३५, रा.डोंबिवली, ठाणे,ह.मु.कोकणवाडी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-०५-डीएन-४२३७) चोरट्याने १४ जून रोजी घराजवळून चोरून नेली.

चौथ्या घटनेत, मिर्झा शाहरूख बेग मिर्झा सलीम बेग (वय २६,रा.गरमपाणी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफए-६१६०) चोरट्याने ८ जून रोजी स्टारलाईट कंपनीजवळून चोरून नेली. शहराच्या विविध भागातून दुचाकी वाहने लंपास करणाऱ्या चोरट्याविरूध्द अनुक्रमे सातारा, सिडको, वेदांतनगर आणि एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!