मुंबई : शिवसेना पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक हे पावसाळी अधिवेशनाला हजर राहिले असून यावेळी माध्यमांशी बोलताना कौटुंबिक कारणामुळे इतक्या दिवस मीडियापासून दूर होतो असा खुलासा केला. तसेच माझ्या मागे मुद्दाम ईडीचा ससेमिरा लावल्याचा आरोपही सरनाईक यांनी यावेळी केला.
विधिमंडळात आल्यानंतर सरनाईक म्हणाले की, आज अधिवेशन असून, प्रतोंदांनी व्हीप बजावला असल्याने त्याचे पालन करायला मी आलो आहे. देशात कुठेही माझ्यावर गुन्हा दाखल नाही. तसेच, लेखी स्वरूपात आरोप आणि जबाबही दाखल नाही. एमएमआरडीए बाबत माझ्या विरोधात करण्यात आलेल्या आरोपांची तपासणी केली जात आहे. माझ्यावर झालेली हृदय शस्त्रक्रिया झाली असून, माझी पत्नीही कर्करोगाने आजारी होती. त्यामुळे मी काही दिवस शांत राहण्याचा निर्णय घेतला होता, असे सरनाईक यांनी सांगितले.
मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीच्या कारवाईवरुन सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपसोबत जुळवून घेण्याची मागणी केली होती. त्यामुळं प्रताप सरनाईक पुन्हा चर्चेत आले होते. सरनाईक अज्ञातवासात असल्यानं विरोधकांनीही त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. या सर्व घडामोडीनंतर प्रताप सरनाईक हे आज विधानभवनात दाखल झाले आहे. तसंच, त्यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा निषेधही केला आहे.
पळून जायला मी काय मोदी किंवा मल्ल्या नाही
देशात माझ्याविरुद्ध एकही एफआयआर दाखल झालेला नाही. मी कोणत्याही घोटाळ्यात असल्याचा कुणीही जबाब दिलेला नाही. एमएमआरडीएच्या प्रकरणात माझ्यावर आरोप झाले. त्यावर एमएमआरडीएने आर्थिक गुन्हे शाखेकडे आणि ईडीकडे स्टेटमेंट दिलं आहे, असं सांगतानाच देश सोडून जायला मी काही नीरव मोदी, मेहुल चोक्सी किंवा विजय मल्ल्या नाही, असं सरनाईक म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘अनिल देशमुख देखील असेच मधात बोलत होते, आता ते आत जाताहेत’, मुनगंटीवारांचे सभागृहात वादग्रस्त वक्तव्य
- मोठी बातमी! ‘एमपीएससीची सर्व रिक्त पदे ३१ जुलैपर्यंत भरणार’, अजित पवारांची घोषणा
- स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये द्या; सुधीर मुनगंटीवार यांची विधिमंडळात मागणी
- हकालपट्टीनंतर दोन आठवड्यात अझरुद्दीनने केले पुनरागमन
- संजय राऊत यांना विरोधकांना उपदेशाचे डोस पाजण्याचा नैतिक अधिकार आहे का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
