🕒 1 min read
नाशिक: टवाळखोर दारू पिऊन गोंधळ घालत असल्याची तक्रार देण्यासाठी स्थानिकांनी पोलिस चौकी गाठली मात्र पोलिसांचीच दारू पार्टी सुरू असल्याचे धक्कादायक चित्र नाशिककरांना बघायला मिळाले आहे. नाशिकच्या डी.के. नगर भागातील पोलिस चौकीत हा प्रकार बघायला मिळाला आहे.
गंगापूर रोड परिसरातील स्थानिक नागरिक दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांची तक्रार करण्यासाठी नाशिककरांनी गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी. के. नगर पोलीस चौकी गाठली. तर तिथे पोलिसच दारुची पार्टी झोडताना आढळून आले. हा सगळा प्रकार स्थानिकांनी त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. मद्यधुंद अवस्थेतील पोलिसांनी एका नागरिकाला मारहण केल्याचा देखील आरोप होतो. आता या दारूड्या पोलिसांवर काय कारवाई होते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
मुंबई पोलिसांवर ‘पुष्पा’ फिवर; श्रीवल्ली गाण्यावर भन्नाट पेरफॉर्मन्स
-
१२-१४ वयोगटाच्या लसीकरणास आजपासून सुरुवात; अनेक ठिकाणी मुलांचा चांगला प्रतिसाद
-
मनसेचा दणका; कार्यकर्त्यांकडून IPL साठी आणलेल्या बसेसची तोडफोड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
