Share

ऑलिम्पिक विशेष! सप्तपदक मंडळातील तिसरी शिलेदार ‘लव्हलीना बोरगोहेन’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंतच्या ऑलिम्पिक इतिहासातील सर्वाधीक पदके पटकावली. या स्पर्धेत भारताने १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्यपदकाची कमाई केली. या पदकविजेत्यांचा घेतलेला हा आढावा. यातील तिसरी पदकविजेता खेळाडू लव्हलीना बोरगोहेन.

टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष बॉक्सरने निराश केल्यानतर भारतीय महिला बॉक्सरपैकी मेरी कॉम, पुजा राणी आणि लव्हलीना बोरगोहेन या पदकाच्या शर्यतेत होत्या. यापैकी केवळ लव्हलीना बोरगोहेनला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवता आला. लव्हलीना बोरगोहेनने ऑलिम्पिक स्पर्धेत ६९ किलो वजनी गटाच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत लव्हलीना बोरगोहेनने जर्मनीच्या नदीने अप्तेजला पराभुत करत उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली.

उपांत्यपुर्व फेरीत भारताकडून मेरी कॉम, पुजा राणी, सतिश कुमार आणि लव्हलीना बोरगोहेन हे पोहोचले होते. मात्र लव्हलीना बोरगोहेन वगळता इतर सर्व बॉक्सर अपयशी ठरले. उपांत्यपुर्व फेरीत लव्हलीनाने चायनाच्या चेन निन चिनला नमवत उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला. मात्र उपांत्यफेरीत लव्हलीनाला तुर्कीच्या बासेन्झ सुरमेलेनी समोर पराभव स्विकारावा लागला. मात्र या फेरीत प्रवेश करताच तिचे पदक निश्चीत होते. त्यामुळे पराभवानंतरही लव्हलीना कांस्यपदकाची मानकरी ठरली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!