🕒 1 min read
मुंबई : भारतीय हॉकी संघाचा गोलकिपर पीआर श्रीजेश सध्या चर्चेचा विषय बनला आहे. श्रीजेशला नुकतेच प्रतिष्ठित वर्ल्ड गेम्स प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. त्याच्या प्रभावी कामगिरीसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मिळवणारा तो केवळ दुसरा भारतीय खेळाडू आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर पी श्रीजेशने विश्वचषक जिंकण्याची इच्छा जाहीर केली आहे.
पुरस्कार मिळाल्यानंतर पी श्रीजेश म्हणाला ” हा पुरस्कार केवळ भारतीय हॉकीसाठीच नाही तर जागतिक हॉकीसाठीही विशेष आहे. मला एक खेळाडू म्हणून जगात ओळख मिळाली आहे. FIHने भारतीय खेळाडूला नामांकित केले ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. भारतीय प्रेक्षक माझ्यावर प्रेम करतात आणि वोटिंग मध्ये कधीही मागे पडत नाहीत. एक खेळाडू म्हणून माझे काम देशाचे नाव कमावण्याचे आहे. चाहत्यांनी माझ्या आणि हॉकीवरील प्रेम मतांच्या माध्यमातून दाखवले आहे. केवळ भारतातून नाही तर जगभरातून मला वोट मिळाले आहेत.”
ऑलिंपिकमध्ये पदक जिंकल्यानंतर आणि पुरस्कारांनी सन्मानित झाल्यानंतर पुढील वाटचाल कशी असेल याविषयी देखील त्याने सांगितले आहे. ” ऑलिम्पिक पदक जिंकणे हे स्वप्न होते. आता ते सत्यात उतरले आहे. पण पदकाचा रंग बदलण्याची आशा आहे . आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आणि पुढील वर्षी भुवनेश्वर येथे होणारा विश्वचषक जिंकून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे हे माझे सध्याचे लक्ष आहे.” पी श्रीजेश काही दिवसांनी दक्षिण आफ्रिकेत हॉकी प्रो लीग मध्ये खेळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- “उद्धव ठाकरे पोवळा तर अजित पवार ढोवळा”, वाईनविक्रीवरून बंडातात्या कराडकरांची टीका
- क्रिकेट प्रेमींना महिला क्रिकेट लीगची पर्वणी
- पुष्पा’तील ‘श्रीवल्ली’चं काश्मिरी व्हर्जन ऐकलं का, ऐकून व्हाल दिवाने
- ‘मनसुख हिरेन हत्येच्या कटात परमबीर सिंहच मास्टरमाईंड’; अनिल देशमुखांचा जबाब
- Board Exams: औरंगाबादेत शिक्षण संस्था महामंडळाचा दहावी-बारावी बोर्डांच्या परिक्षांवर बहिष्कार..!

