Share

“उद्धव ठाकरे पोवळा तर अजित पवार ढोवळा”, वाईनविक्रीवरून बंडातात्या कराडकरांची टीका

Published On: 

सातारा : महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या वाईनविक्री निर्णयावरून राज्यातील भाजप नेते आक्रमक झालेच आहेत, आता यावरूनच ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर(Criticism of senior kirtankar Bandatatya Karadkar) यांनी थेट मुख्यमंत्र्यांना (Chief Minister Uddhav Thackeray) पोवळा तर अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांना ढोवळा म्हटले आहे.

कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असा सवाल करत पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? तसेच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख बंडातात्या कराडकर यांनी केला आहे.

मंत्रिमंडळातील मूठभर आमदारांनी एकतर्फी निर्णय घेत राज्यावर दारुविक्रीचा हा अत्याचार केला आहे. याविरोधात एकच संस्था तळमळीने काम करत आहे ती म्हणजे व्यसनमुक्त युवक संघ. समाजाच्या कल्याणासाठी गेली २५ वर्ष आम्ही हे काम करत आहे. असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान वाईन विक्रीच्या विरोधात व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

तसेच हे आंदोलन येथे थांबणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र रुप घेईल. त्यानंतर राज्य सरकारवर वाइन विक्रीची जी धुंदी चढली आहे ती कमी होईल असेही बंडातात्या कराडकर यांनी म्हटले आहे. तसेच ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही गुण लागला अशी शेतकऱ्याची म्हण आहे. असे म्हणत उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार असं ते म्हणाले आहेत. अजित पवारांनी दारु विकण्याचा गुण लावला. त्यांनीच मंदिरं खुली करायची नाहीत असं सांगितलं. हे सगळं अजित पवारांचं असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!