🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने स्मार्ट सिटी बसकरीता खासगीकरणातून दिडशे बसथांबे बांधण्याचा निर्णय घेतला होता. या बसथांब्याच्या माध्यमातून मनपाला आर्थिक उत्पन्न आणि प्रवाशांना थांबण्यासाठीची सोय हे उद्देश होते. दिडशे पैकी १०८ बसथांबे सुनियोजित जागी उभारण्याचे काम झाले आहे. मात्र नवीन थांब्यांच्या उभारणीनंतर शहरातील जुने थांबे अजूनही तसेच आहेत. याठिकाणी कचरा, मद्यपी, बेघरांचा अड्डा तयार झाला आहे. मात्र मनपा आणि स्मार्ट सिटी दोहो हि जबाबदारी एतमेकांवर ढकलत आहे.
शहरात दोन वर्षापूर्वी स्मार्ट सिटी बस सुरु करण्यात आल्या. मोठा गाजावाजा करत सुरु करण्यात आलेल्या या स्मार्ट बसकरीता असलेले थांबे अतिशय घाणेरड्या अवस्थेत होते. दुरावस्था झालेल्या या थांब्यावरच प्रवासी कसेबसे उभे राहत असत. काही महिन्यात मुंबईच्या एका कंपनीला स्मार्ट थांबे तयार करण्याचे काम देण्यात आले. व शहरात आज १०८ स्मार्ट बसथांबे आहेत. मात्र जुने, मोडकळीस आलेले बसथांबे आजही त्याच अवस्थेत पाहायला मिळत आहे. परिणामी कचरा टाकण्यासाठी, प्रातविधी, आणि बेघरांकडून निवारा केंद्र म्हणून यांचा वापर होत आहे.
शहरात जालना रोड, औरंगपुरा, उल्कानगरी, सूतगिरणी चौक यांसह अनेक ठिकाणी जुने बसथांबे पूर्वीच्याच परिस्थितीत आहेत. यांचा वापर कचरा टाकण्यासाठी केला जातो. तसेच पादचाऱ्यांकडून प्रातविधीकरीता देखील याचा वापर होतो. बेघर, भिकारी, मद्यपी याठिकाणी रात्री अपरात्री निवारा करतात. त्यामुळे हे जुने मोडकळीस आलेले, जीर्ण बसथांबे पाडून बंद करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. मात्र प्रशासनाचे याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे.
हि तर पालिकेची जबाबदारी- स्मार्ट सिटी विभाग
याबाबत स्मार्ट सिटी बस विभागाशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जुने बसथांबे हि महानगरपालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे हे थांबे हटवण्याचे कामही त्यांचेच आहे. याबाबत त्यांना सांगितले आहे मात्र मध्यंतरी कोरोनाच्या काळात हे काम पूर्ण झालेले नाही. पुन्हा एकदा याबाबत माहिती घेऊ. असे बस विभागाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे नेमकी जबाबदारी कोणाची आणि पूर्ण कोण करणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- एक ना एक दिवस मी पंतप्रधान जरुर होईन; त्यासाठी कोणाचाही आधार घेईन – महादेव जानकर
- डॉक्टर्स डे विशेष! प्रत्येक दिवस नवी संकटे, नवी आव्हाने – डॉ. नीता पाडळकर
- आजपासून औरंगाबादेत लसीकरण बंद! केवळ तीन केंद्रांवर कोवॅक्सिन उपलब्ध
- विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाला राष्ट्रवादीचा विरोध?
- Breaking News! पडळकरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

