🕒 1 min read
कोल्हापूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर हे गेले काही महिने पुन्हा चर्चेत आले आहेत. महादेव जानकर यांना धनगर समाजाचा मोठा पाठींबा असून फडणवीस सरकारच्या काळात त्यांना मंत्रिमंडळात देखील स्थान देण्यात आलं होतं. यानंतर, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी वेगळं पाऊल टाकण्याबाबत काही विधाने केली होती.
आता त्यांनी थेट पंतप्रधानपदाला गवसणी घालण्याची इच्छा स्पष्ट केली आहे. ‘मी कुणाचा गुलाम म्हणून फिरत नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचं अंतिम ध्येय दिल्ली आहे. त्यामुळे कोणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान जरुर होईन,’ असं विधान महादेव जानकर यांनी कोल्हापुरात बोलताना केलं आहे. तर, ‘काँग्रेस- राष्ट्रवादीचा रस्ता डांबरीकरणाचा आहे, तर भाजपचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे. मी मात्र पाणंदीने पुढे चाललो आहे. माझाही सूर्य कधी तरी उगवेल,’ असा विश्वास देखील जानकर यांनी व्यक्त केला. याबाबत एका खाजगी वृत्तवाहिनीने वृत्त दिलं आहे.
दरम्यान, 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि महादेव जानकर यांच्यात लढत झाली होती. त्यामध्ये महादेव जानकर यांचा 69 हजार मतांनी पराभव झाला. त्यावेळी जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कपबशी या चिन्हावर निवडणूक लढवली होती. तर, भाजपसोबत हातमिळवणी केली. मात्र, २०१९ लोकसभा निवडणुकांवेळी बारामतीमधून जानकर यांना भाजपने डच्चू देत कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. यामुळे ते नाराज देखील झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही’
- गुन्हा दाखल झाल्यावर पडळकर संतप्त; म्हणाले, ‘मग अजित पवारांना का सोडले?’
- ‘केंद्र सरकारला काय करायचे ते करू द्या, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही’
- संतापजनक ! ‘संजय राठोडांच्या वाढदिनी शिवाजी महाराजांच्या मुर्तीभोवती फेकून दिलेले हार-बुके
- ‘चपटी लावलेली असली की लोक हत्तीलाही मुंगी समजतात’, आव्हाडांचा पडळकरांवर निशाणा


