Share

डॉक्टर्स डे विशेष! प्रत्येक दिवस नवी संकटे, नवी आव्हाने – डॉ. नीता पाडळकर

Published On: 

औरंगाबाद : कोरोना महामारीच्या काळात सर्व डॉक्टर्स, इतर वैद्यकीय कर्मचारी सतत कार्यरत आहेत. मागे वळून पाहताना या कठिण काळात आपले ज्ञान, कौशल्य यांचा वापर लोकांच्या भल्यासाठी, सेवेसाठी करता आला याचेच समाधान वाटते. या काळात उपचारांची, उपाययोजनांची दिशा ठरवतांना प्रत्येक दिवशी नवीनच संकट उभे राहत होते. मात्र या सर्वांमधून आपण बाहेर आलो याचा सर्वाधिक आनंद आहे. मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर बोलत होत्या. डॉक्टर्स डे निमित्त महाराष्ट्र देशाने त्यांच्याशी विशेष संवाद साधला.

माझ्या वैद्यकीय कार्यकाळात एवढ्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच मी असा काळ पाहिला. ज्यात रोग नवीन होता, उपचार, निदान, तपासण्या सर्वकाही नवीन होते. त्यामुळे आलेल्या संकटावर मात करत हळूहळू रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर दिलासा मिळत होता. दरम्यानच्या काळात कोविड सेंटरमध्ये एका महिलेसोबत डॉक्टरने वाईट वागण्याचा प्रयत्न केला. सर्व काही समजून घेत या प्रकारणात खोलाशी जाण्याचा प्रयत्न केला होता.

हे प्रकरण खूप वाढले. त्यावेळी फार मनस्ताप सहन करावा लागला. मात्र आमच्या कर्तव्यात आम्ही कधीही चुकलो नाही, कमी पडलो नाही. कोरोनाने आपल्या भरपूर काही शिकवले आहे. यात आपला आहार कसा असावा, जीवनशैली कशी असावी हे सर्व अधोरेखित झाले. आता एकच अपेक्षा आहे ते म्हणजे या काळातून प्रत्येकाने एक धडा घ्यावा. आणि मास्कचा वापर, स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग, योग्य आहार, व्यायाम, उत्तम आरोग्य याकडे लक्ष द्यावे. कारण जीवन हेच सर्वात मौल्यवान आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!