Share

आजपासून औरंगाबादेत लसीकरण बंद! केवळ तीन केंद्रांवर कोवॅक्सिन उपलब्ध

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद शहरात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. बुधवारी मनपाकडे केवळ ३०० लसींचा साठा शिल्लक होता. त्यामुळे प्रोझोन मॉलच्या पार्किंग मध्ये नागरिकांनी एकच गर्दी केली होती. केवळ तीनशे लसी असल्याने नागरिकांना अनेक तासांसाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. आजही सलग तिसऱ्या दिवशी लसींचा पुरवठा न झाल्याने आजपासून लसीकरण बंद करण्यात आले आहे. आता केवळ कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस मिळत आहे.

मंगळवारी (दि.२९) लसीकरणानंतर महापालिकेकडे केवळ ३०० लसी शिल्लक होत्या. त्यामुळे प्रोझोन मॉल येथील पार्किंगमध्ये ड्राइव्ह इन आणि पायी आलेल्या नागरिकांसाठी असे दोन स्टॉल लावण्यात आले होते. लसीकरणाची वेळ सकाळी १० ची असल्याने नागरिकांनी गर्दी केली. तसेच दुसऱ्या बाजूला कारच्याही रांगा लागल्या होत्या. प्रत्यक्षात दुपारी एक वाजता लसीकरणाला सुरुवात झाली. तोपर्यंत प्रचंड गोंधळ रेटारेटी सुरू होती.

या संपूर्ण गोंधळात अनेकांचा नंबर येईपर्यंत लसींचा साठा संपला होता. त्यामुळे कित्येकांना आल्यापावली परत फिरावे लागले. आजही लसींचा साठा आलेला नाही तसेच तो कधीपर्यंत येऊ शकतो याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाला काहीही माहिती नाही. त्यामुळे आज शहरात केवळ राज नगर, क्रांती चौक, एमआयटी हॉस्पिटल एन-२ याठिकाणी कोवॅक्सिन लसीचा पहिला तसेच दुसरा डोस मिळेल. मात्र आता कोविशिल्ड लसींचा साठा येईपर्यंत लसीकरण मोहिम बारगळल्याचे पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!