सोलापूर : अनेक दिवस शांत असलेले सोलापूर हे शहर कालपासून राजकीय पटलावर चर्चेत आले आहे. येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर जहरी भाषेत टीका केली होती. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. टीका केल्याने पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर आज कोरोना नियमांचे भंग केल्याने पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे या घडामोडी राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना सोलापुरात आज एक खळबळ उडवून देणारा प्रकार घडला आहे.
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा कार्यालयाच्या काचेवर दगड मारुन तोडफोड करण्याचा प्रयत्न दोन व्यक्तींनी केला आहे. रामलाल चौकातील कार्यालयावर हा हल्ला झाला. तोडफोड करणारे दोघे पडळकर समर्थक असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाहीये. मात्र, याचे पडसाद उमटने सुरू झाले आहे.
गुन्हा दाखल झाल्याने पडळकर संतप्त
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर सोलापूर जिल्ह्यात घोंगडी बैठका घेत आहे. सोलापूरातील मड्डी वस्तीत बैठक होती. ती बैठक सायंकाळी साडेसहा वाजता सुरू झाली. कोरोनाचे निर्बंध असतानाही दुपारी ४ नंतर बैठक घेतल्यामुळे पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई केल्याने पडळकर संतप्त झाले आहेत. प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ‘नियमांची पूर्ण काळजी घेत आम्ही घोंगडी बैठक आयोजित केली होती. पण ही बैठकही झाली नाही. पोलिसही तिथे उपस्थित होते. तरीही माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर करा. पण पुणे येथे पक्षाच्या कार्यालयाचे उद्धाटन करताना हजारोंची गर्दी करणाऱ्या अजित पवारांवर आधी गुन्हा दाखल करा. पंढरपुरात जयंत पाटील यांनी मोठी गर्दी जमा केली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा’, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गुन्हा दाखल झाल्यावर पडळकर संतप्त; म्हणाले, ‘मग अजित पवारांना का सोडले?
- अन् सोलापूर पोलिसांनी आ.गोपीचंद पडळकरांविरुद्ध गुन्हा दाखल केला!
- बीडमध्ये उद्या मराठा आरक्षण जनसंवाद; छत्रपती संभाजीराजेंची उपस्थिती
- ‘राज्यपालांच्या सगळं लक्षात आहे, फक्त ते आमदारांच्या यादीचे विसरलेत’, ‘त्या’ पत्रावरून राऊतांचा टोला
- ‘राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

