Share

अधिकाऱ्यांना शासनादेशाची विसर! पैठणमध्ये होणार ऑफलाईन बैठक

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भाव पाहता शासनाने शासकीय कामकाजासाठी होणाऱ्या बैठका ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे आदेश दिले असतांना दि.८ रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी काळुराम बागुल यांनी ऑफलाईन बैठकीचे आयोजन करुन एक प्रकारे शासनादेशला हरताळ फासण्याचा प्रयत्न केलेला आहे.

कोरोनाचा प्रभाव पाहता शासनाने व्यापारी, प्रशासन तसेच नागरिकांना अनेक नियम बांधुन दिलेले आहेत. कार्यालयीन उपस्थिती आणि शासकीय बैठकीसाठी नियम लावले असून शासनादेशात कार्यालयीन बैठकीसाठी विशेष मार्गदर्शक सुचना दिल्या असून कार्यालयीन बैठका हे ऑनलाईन पध्दतीनेच घेण्याचे सुचना दिलेल्या आहेत.

असे असतांना पैठण पंसचे गटविकास अधिकारी काळुराम बागुल यांनी पंसच्या सर्व अधिकारी कर्मचारी, ग्रामसेवक तसेच विविध विभागातील अभियंते त्यांचे कार्यालयीन कर्मचारी पंसचे सदस्य सभापती उपसभापती आदींची थेट ऑफलाईन बैठकीचे गुरुवारी ११ वाजता आयोजन केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!