कोल्हापूर : मला त्रास देण्यासाठी हे सगळ सुरु आहे. माझ्याविरोधात रचलेले एक षडयंत्र आहे. मला भाजपात येण्याची ऑफर चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. असा गौप्यस्फोट केला आहे. तसेच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत घेऊन फेटाळले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाचे अस्तित्व संपले आहे. हे फक्त मुश्रीफांमुळे शक्य झाले. त्यामुळे त्यांनी मला भाजपात येण्याची ऑफर दिली, पण मी ठणकावून सांगितलं, पवार एके पवार. त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली. आता महाविकास अघाडी प्रबळ झाली असून भाजपाला यश मिळत नसल्याने हे सगळं सुरु आहे. असेही हसन मुश्रीफ म्हणाले.
पुढे बोलताना मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांत पाटलांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं, माझी बदनामी करुन त्यांना काही मिळणार नाही. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. मी त्यांच्यावर आधी १०० कोटींचा आणि एक ५० कोटींचा दावा ठोकणार आहे. तसेच दोन अब्रुनुकसानीचे दावेही दाखल करणार आहे. असे मुश्रीफ म्हणाले. सोमय्यां यांनी घेतलेली सीए ची पदवी शंकास्पद आहे. त्यांनी अभ्यास करावा. मी सीए पाठवतो, ते पाहून घ्या असेही मुश्रीफ यावेळी म्हणाले.
मला भाजपामधील नेते सांगत आहेत, आम्ही सोमय्यांना म्हणत होतो मुश्रीफांच्या नादाला लागू नका. काल आरोप केला त्याबद्दल त्यांनी माफी मागायलाच हवी. ते आप्पासाहेब नलावडे कारखान्याच्या गैरव्यवहाराबद्दल बोलले. मात्र बिक्स इंडिया कंपनीशी माझा आणि माझ्या जावयाचा काहीही संबंध नाही. मी सर्व कागदपत्रे तपासले, बिक्स इंडिया कंपनी ही ४४ लाख भागधारकांची कंपनी आहे, ही शेल कंपनी नाही, त्याचे शेअर १ लाख आहे मग १०० कोटींचा घोटाळा कसा होईल. २०१२-१३ मध्ये हा कारखाना शासनाने १० वर्षासाठी सहयोगी तत्वावर बिक्स फॅसिलिटीला चालवायला दिला होता. ते म्हणतात २०२० ला दिला. सोमय्यांनी अभ्यास करायला हवा होता. असा टोलाही मुश्रीफांनी सोमय्यांना लगावला.
पुढे बोलताना मुश्रीफ म्हणाले, माझे नेते शरद पवार आहेत. महाविकास आघाडी, परमबीर सिंग किंवा केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराबद्दल पत्रकार परिषदा घेऊन मी आवाज उठवला आहे. याच कारणाने भाजपा नेते मला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. किरीट सोमय्या यांचा टूल म्हणून भाजपाने वापर केल्याचेही ते म्हणाले. किरीट सोमय्या हे चुकीचे आरोप करत आहेत. त्यामुळे काही दिवस सर्व कार्यकर्त्यांनी सय्यम बाळगावा असेही मुश्रीफ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- आजचा सामना रंगणार RCB विरुद्ध KKR
- ‘जेव्हा तुमच्याकडे माही भाई असतो तेव्हा…’, धमाकेदार खेळीचे ऋतुराजने कर्णधाराला दिले श्रेय
- मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची शानदार खेळी ; चेन्नईची मुंबईवर २० धावांनी मात
- UAE मध्ये मुंबई इंडियन्सचा खराब रेकॉर्ड; आतापर्यंत एकदाही जिंकला नाही सामना
- ‘अपेक्षेपेक्षा चांगल्या स्कोअरवर नेले’, माहीने ‘या’ दोन शिलेदारांना दिले विजयाचे श्रेय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

