मुंबई : कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. तसेच अनेक भागात मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे असंख्य कुटुंबांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकार आता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासंदर्भात काही निर्णय घेत आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या गावांच्या सुरक्षेसाठी संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय राज्य सरकार घेत आहेत.
समुद्राचे पाणी गावांमध्ये शिरून घटना घडू नये किंवा शेत जमिनी समुद्राच्या पाण्याने खराब होऊ नये यासाठी संरक्षण भिंत बांधणार आहे. पाच जिल्ह्याच्या अनेक भागात जवळपास 171 किलोमीटर संरक्षण भिंत बांधावी लागणार आहे. यासाठी जवळपास 1600 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. मात्र, राज्य सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे मनसेचे नेते आणि ग्रीनअर्थ फाऊंडेशनचे संचालक अनिल शिदोरे यांनी म्हटलं आहे.
अनिल शिदोरे यांनी ट्विट करुन आपली भूमिका मांडली आहे. ‘नद्यांच्या पाण्यापासून संरक्षण म्हणून भिंती बांधण्यासंदर्भातील निर्णयाचा सांगोपांग विचार व्हावा, असे त्यांनी सूचवले आहे. पुन्हा पुन्हा पूर येऊ नये म्हणून सर्वतोपरी काम करावं हे बरोबर असलं तरी नद्यांना भिंती बांधणं कितपत योग्य आहे, ह्याचा सांगोपांग विचार व्हावा.. नद्यांचा नैसर्गिक प्रवाह अडवणं दूरगामी धोक्याचं असतं, अशी माझी समजूत आहे. तपासून बघायला हवे’ असे शिदोरे यांनी मत व्यक्त केले आहे.
पुन्हा पुन्हा पूर येऊ नये म्हणून सर्वतोपरी काम करावं हे बरोबर असलं तरी नद्यांना भिंती बांधणं कितपत योग्य आहे ह्याचा सांगोपांग विचार व्हावा.. नद्यांचा नैसर्गिक प्रवाह अडवणं दूरगामी धोक्याचं असतं अशी माझी समजूत आहे. तपासून बघायला हवं.. @AjitPawarSpeaks #महाराष्ट्रपूर pic.twitter.com/OjShFYZ0BI
— Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) July 27, 2021
दरम्यान, कोकणातील दुर्घटना आणि नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी निर्णयामधील राज्य सरकारचा हा एक प्रयत्न आहे. केरळ सरकारने अशाच पद्धतीने निर्णय घेऊन संरक्षण भिंत बांधली आहे. त्याच धरतीवर राज्य सरकार हा निर्णय घेत आहे. अशी माहिती सध्या मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज-यलो ॲलर्ट
- महाराष्ट्राचा विक्रम, ३ कोटी नागरिक ठरले पहिल्या लसीचे लाभार्थी – राजेश टोपे
- धक्कादायक; चालकाचे नियंत्रण सुटल्याने कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची गाडी पलटली
- क्रिकेटप्रेमींसाठी धक्कादायक बातमी : ‘या’ भारतीय खेळाडूला कोरोनाची लागण; आजचा सामना पुढे ढकलला
- ‘तळीये’चे दुख: ‘माळीण’ने जाणले ; मदतीसाठी केला एक हात पुढे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

