मुंबई: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाज माध्यमावर कोरोना लसीची माहिती देत राज्याने लसिकरणात विक्रम केल्याचे म्हटले आहे. राज्यात आतापर्यंत ३ कोटी १६ लाख ९ हजार २२७ लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तर कोरोन प्रतिबंधात्मकचे दोन्ही लस घेतलेल्या नागरिकांची संख्या १ कोटीच्या पार पोहचली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. त्यामुळे लसीकरणात राज्याने हा नवा विक्रम केला आहे.
दरम्यान राज्यात आतापर्यंत ६२ लाख कोरोनाचे रुग्ण होऊन गेले आहेत. त्यापैकी दीड लाख कोरोना रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर पुन्हा नव्याने राज्यात ४ हजार नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आली आहेत. त्यामुळे राज्याने लसीकरणावर जोर दिला असल्याचे स्पष्ट होते.
— Rajesh Tope (@rajeshtope11) July 27, 2021
पहिला डोसच्या लाभार्थ्यांची संख्या जरी अधिक असली तरी अजूनही दुसरा डोस नागरिकांना उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे अजूनही नागरिक लसीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. दरम्यान १ कोटी नागरिकांनी कोरोना विरोधाचे दोन्ही लस घेतल्या आहेत. त्यामुळे राज्यात लसीकरणाचा रेट अधिक असल्याचे यातून स्पष्ट होते.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री ठाकरेंना दिल्या पंतप्रधान मोदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले…
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी
- आसाम मिझोराम सीमावादातून हिंसाचार, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू
- ‘शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत रिंग रोडची मोजणी करून देणार नाही’
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द


