🕒 1 min read
श्रीलंका : भारताची ‘युवा’ टीम सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. वन-डे मालिका भारतीय संघाने जिंकली असून सध्या टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. भारताने तीन टी-२० सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
आज या मालिकेतील दुसरा सामना होणार होता. मात्र त्याआधी भारतीय खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आज(२७ जुलै) रोजी होणारा दुसरा टी-२० सामना पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबत, बीसीसीआयने ट्विट करून माहिती दिली आहे.
NEWS : Krunal Pandya tests positive.
Second Sri Lanka-India T20I postponed to July 28.
The entire contingent is undergoing RT-PCR tests today to ascertain any further outbreak in the squad.#SLvIND
— BCCI (@BCCI) July 27, 2021
‘कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे दुसरा टी-२० सामना २८ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. संघात आणखी कोणी कोरोनाग्रस्त आहे का हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण संघाची आरटी-पीसीआर चाचणी केली जात आहे,’ अशी माहिती बीसीसीआय कडून देण्यात आली आहे. दरम्यान, आठ सदस्य हे कृणालच्या संपर्कात असल्याचे मेडिकल टीमने सांगितले असून कृणालच्या तब्येतीबाबत अद्याप माहिती मिळालेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोकणसह ‘या’भागात पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता
- ‘काळजी करू नका ; मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत’ – राज ठाकरे
- आसाम मिझोराम सीमावादातून हिंसाचार, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू
- ‘पूरग्रस्त कुटुंबाला १५ हजार, घरांच्या नुकसानीसाठी ५० हजार तर व्यापारी-विक्रेत्यांना नुकसानीच्या २५ टक्के रक्कम द्या’
- उद्धव ठाकरेंनी भविष्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावीत; शिवसेनेच्या खासदाराने व्यक्त केली इच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
