Share

‘ओबीसी आरक्षण’ फार्दपुरात शनिवारी रास्तारोको

Published On: 

औरंगाबाद : ओबीसी समाजाला राजकीय व सामाजिक आरक्षण मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ फर्दापूर (ता.सोयगाव) येथील औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी दि.२६ रोजी रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय मंगळवारी दि.२२ सायंकाळी फर्दापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात भाजपा ओबीसी मोर्चाच्या बैठकीत जाहीर करण्यात आला आहे.

या बैठकीस भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळे, ओबीसी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन रिठे, सरचिटणीस अनिल मोरे, सोयगाव तालूकाध्यक्ष मंगेश सोहनी, सिल्लोड तालुकाध्यक्ष सुधाकर सोनवणे, भाजपचे फर्दापूर शहराध्यक्ष समाधान बावस्कर, प्रशांत गायकवाड, गजानन शिरसाठ, नारायण कापसे आदींसह पदाधिकारी व कार्यकत्र्यांची उपस्थिती होती.

महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसींच्या आरक्षणासाठी आवश्यक असलेला इम्पेरियल डेटा सादर केला नसल्याने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले असल्याचा व महाविकास आघाडी सरकारचे ओबीसी समाजाचे काही मंत्री ओबीसी आरक्षणासाठी आंदोलने करुन दुटप्पी भूमिका घेत असल्याचे आरोप भाजपाकडून वारंवार करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी शनिवारी राज्यभरात रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!