🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे- केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी हिताच्या विधेयकाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दिलेली स्थगिती उठवण्यात यावी. कोरोनाच्या संकट काळात मी लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लोकांना धीर देण्यासाठी जनतेपर्यंत जात आहे. जनतेमुळे मला ऊर्जा मिळत असल्याने मला कोरोना होणार नाही.
तसेच कोरोनाच्या भीतीने अहमदनगर जिल्ह्यातील तीनही मंत्री घरात बसून आहेत. अशी टीका माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्ह्यातील मंत्री बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख व प्राजक्त तनपुरे यांच्यावर केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने पोखडी, दहिगाव येथील शेतकऱ्यांना खेळते भांडवलाचा धनादेश वाटप कार्यक्रम माजी आमदार कर्डिले यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
मा.आ. कर्डिले पुढे म्हणाले की, नगर जिल्ह्यातील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खेळते भांडवल उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे.
त्यामुळे अहमदनगर जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांना फायद्याची ठरत आहे. ह्या बँकेच्या माध्यमातून जिरायत भागातील शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. आजपर्यंत आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांना कसा आधार मिळेल, यासाठी प्रयत्न केला आहे. आशिया खंडात सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेली ही बॅंक शेतकऱ्यांचा तारणहार ठरली आहे. सध्या अतिवृष्टीमुळे नगर जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आहेत. त्यांना या कर्जरुपाने दीपावलीची भेट मिळत आहे, असे कर्डीले म्हणाले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष मस्के, खरेदी-विक्री संघाचे सुरेशराव सुंबे, दिलीप भालसिंग, बबनराव आव्हाड, भाऊसाहेब बोठे, जगन्नाथ मगर, इस्माईल शेख, राम साबळे, मधुकर मस्के, दादासाहेब दरेकर, श्रीकांत जगदाळे, महेश मस्के, अनिल ठोंबरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
- माझ्या आदेशानेच पाडवींचा राष्ट्रवादीत प्रवेश; एकनाथ खडसेंनी केला गौप्यस्फोट
- नाराज ओबीसी नेत्यांची मंत्री छगन भुजबळ व वडेट्टीवारांच्या घरी खलबतं!
- मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सरकारने चुकीचा सल्ला देऊ नये : विनोद पाटील
- ‘छोटे नवाब’ तैमूरचा मनोरंजक फोटो सोशल मीडियावर व्हायरल
- विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी काँग्रेसकडून सत्यजित तांबेंच नावं चर्चेत!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
