Share

नाराज ओबीसी नेत्यांची मंत्री छगन भुजबळ व वडेट्टीवारांच्या घरी खलबतं!

Published On: 

मुंबई : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात विविध आंदोलनं मराठा समाजातर्फे करण्यात येत आहे. तर, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत सर्व प्रकारच्या भरती परीक्षा रद्द करण्यात यावा यासाठी खासदार संभाजीराजे, खासदार उदयनराजेंसह मराठा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा देखील दिला होता.

११ ऑक्टोबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली होती यानंतर विद्यार्थ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर, ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाला दुय्यम वागणूक मिळत असल्याची तक्रार ओबीसी समाजाकडून करण्यात येत आहे. सारथीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८ कोटींच्या निधीची तरतूद केली मात्र ओबीसी नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्याची तसदी देखील त्यांनी घेतली नाही. त्यामुळे हे सरकार ओबीसी समाजासाठी काही करणार आहे की नाही? असा उद्विग्न सवाल करत जाब छगन भुजबळ व विजय वडेट्टीवार यांची भेट घेणार असल्याचं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं आहे.

तर सरकारविरोधात रस्त्यावर उतरू!

मराठा समाजाला पाठिंबा असून त्यांना ओबीसी आरक्षणाच्या तरतुदीवरून आरक्षण देण्याला विरोध आहे अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी सुरुवातीपासून घेतली होती. आता आजच्या बैठकीत मंत्र्यांनी ठोस घोषणा व आश्वासन दिलं नाही तर सरकार विरोधात रस्त्यावर उतरून आक्रोश व्यक्त करू अशी भूमिका या नाराज ओबीसी नेत्यांनी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!