जळगाव : माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी प्रवेशानंतर ‘ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक एकनाथ खडसे यांच्या आदेशाने आणि सल्ल्याने मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला’ असा मोठा खुलासा केला.
भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कट्टर समर्थकाच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. दुसऱ्याबाजूला एकनाथ खडसेंना डावलण्यात आल्याने त्यांनी भाजप सोडून योग्य निर्णय घ्यावा अशा मागणीचा जोर समर्थकांनी लावला आहे. त्यामुळे खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, माजी आमदार उदयसिंह पडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तो माझ्या आदेशावरुनच असा गौप्यस्फोट भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उदयसिंह पडवी यांनी मला विचारलं होतं की कोणत्या पक्षात प्रवेश करु तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करा, असं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं. अनेक सहकारी माझ्यावर विश्वास ठेवत पक्षांतर करतात असं म्हणत एकनाथ खडसेंनी स्वतःच्या राष्ट्रवादी प्रवेशावर देखील सूचक पाऊल टाकल्याचं म्हणलं जात आहे.
दरम्यान, घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार. मुंबईत राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला आहे, असा दावा कट्टर खडसे समर्थक असलेल्या माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी केला आहे.
खडसे ‘पक्षांतर’ करणार हे सत्य!
राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात खडसेंच्या पक्षांतरावर सूचक वक्तव्य केलं होतं. ‘सध्या एकनाथ खडसे कोणाच्या संपर्कात आहेत, याची वस्तुस्थिती मला माहिती नाही. पण ते पक्षांतर करतील हे सत्य आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या-
- राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ; जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला ‘हा’ सवाल
- ”राज्यपालांची पत्रातील भाषा वाचून धक्का बसला ”; पवारांनी थेट मोदींना लिहिलं पत्र
- इंदुरीकर महाराजांच्या भाजप नेत्यांशी कानगोष्टी; चर्चांना उधाण
- दुसऱ्यांची उणी काढण्याआधी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या घरातील गोष्टी निस्तराव्यात : राणे
- महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही; पाटील यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

