Share

शेतकऱ्यांविषयी भाजपचे बेगडी प्रेम यंदाच्या अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा सिद्ध झाले-अंबादास दानवे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: २०२२ सालापर्यंतचे शेतकऱ्यांचे उत्पन्न ‘दुप्पट’ करण्याचा भाजपचा संकल्प होता. मात्र तो संकल्प आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात सापडला नाही. शेतकऱ्यांविषयी असलेले भाजपचे प्रेम हे बेगडी आहे. आणि हे या अर्थसंकल्पावरुन पुनश्च एकदा सिद्ध झाले आहे. गतवर्षी शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून दिसलेला जनक्षोभ हेच दर्शवतो की या केंद्र सरकारच्या धोरणांवर आज सामान्य नागरिक आनंदी नाहीच. अशी प्रतिक्रिया औरंगाबादचे शिवसेना आमदार अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी दिली आहे.

मंगळवारी (दि.१) अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. यात त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली. तब्बल ६० लाख नव्या नोकऱ्या, ४०० नव्या वंदे भारत ट्रेन अशा धडाकेबाज घोषणांनी बजेटची ओपनिंग केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प आहे. रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीत मोठी गुंतवणूक केली जाईल, अशी घोषणा यात करण्यात आली आहे. मात्र विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर यावर टिका करत हा अर्थसंकल्प फसवा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार दानवे म्हणाले, लोक जीएसटी प्राधान्याने भरत आहेत. हे जीएसटी संकलनातुन सिद्ध झाले, पण त्याचा लाभ त्यांना मिळतांना दिसत नाही. देशात महागाईचा भडका उडालेला असताना त्यावर कोणताही उतारा आजच्या अर्थसंकल्प भाषणात नाही. इंधन किमती, शैक्षणिक कर्ज आदी गोष्टींत सरकारला वाटा उचलता आला असता. ४८ हजार कोटी रुपयांच्या मदतीने ८० लाख घरं देण्याचा संकल्प केंद्राने केलेला असला तरी ती सामान्यांना मिळावीत ही अपेक्षा लोकांना माफक आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!