Share

नुसरत भरुचाच्या ‘छोरी’ चित्रपटाचा हटके ट्रेलर प्रदर्शित

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बोल्ड, ब्युटीफुल अभिनेत्री नुसरत भरुचा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. लवकरच नुसरतचा ‘छोरी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला असून चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे.

‘लपाछपी’ या मराठी चित्रपटाचा रिमेक असलेला ‘छोरी’ मध्ये नुसरत साक्षीच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलर मध्ये नुसरतशी संबंधित छोरी या पिशाच्च जगाची एक झलक आणि बरचं काही पाहायला मिळणार असून प्रत्येक दृश्यागणिक प्रेक्षकांवरचा ताण वाढत जाणार आहे. यातील थरार प्रेक्षकांचा थरकाप उडवणारा आहे. ‘साक्षी स्वत:ला वाचवू शकेल का?, ती तिच्या गर्भातील बाळाला वाचवू शकेल का?’ प्रेक्षकांना पडणाऱ्या या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपटात मिळणार आहेत. चित्रपटातील भूमिकेविषयी बोलताना नुसरत म्हणाली, भयपटासारख्या नव्या प्रकारच्या चित्रपटात काम करणे एकाचवेळी घाबरवणारे व उत्साहवर्धक आहे.

विशाल फुरीया दिग्दर्शित ‘छोरी’ हा चित्रपट भूषण कुमार, कृष्णन कुमार, विक्रम मल्होत्रा, जॅक डेव्हीस आणि शिखा शर्मा यांनी एकत्रित रीत्या निर्मिती केली आहे. त्यामध्ये नुसरत भरुचा, मिता वशिष्ठ, राजेश जैस, यानिया भारद्वाज आणि सौरभ गोयल यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ वर भारतासहित अन्य २४० देशा-प्रदेशांमध्ये २६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता लागली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!