औरंगाबाद : राज्यातील सलून दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला. या निर्णयास महाराष्ट्र नाभिक महामंडळाने तीव्र विरोध दर्शवून राज्यभर चार टप्प्यात आंदोलन पुकारले. राज्य शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी गुरुवारी ( दि.२२) राज्यभर ठिकठिकाणी मुंडन आंदोलन करण्यात आले. शासनाने नाभिक समाजाला आर्थिक मदत करावी, कर्जाचे हप्ते माफ करण्याची मागणी महामंडळाचे विभागीय अध्यक्ष विष्णू वखरे यांनी केली.
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला. हा निर्णय घेताच नाभिक समाजाने आक्रमक भूमिका घेऊन शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. यापूर्वी शासन निर्णयाची होळी, थाळी-घंटानाद आंदोलन, दुकानासमोर शासनाचा निषेध व्यक्त करणारे फलक हाती घेऊन आंदोलन केले. समाजबांधवानी लोकशाही मार्गाने, जमावबंदी आदेशाचे पालन करून हे आंदोलन पार पाडले.
तरीही शासनाने दखल न घेतल्याने समाज बांधवांनी मुंडन करून जाहीर निषेध केला. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील २० पेक्षा सलून व्यावसायिकांनी आतापर्यंत आत्महत्या केली. इतर व्यावसायिकांप्रमाणे सलून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, समाज बांधवाना आर्थिक मदत करावी, कर्जाचे हप्ते माफ करावे अथवा ते भरण्यास वर्षभराची मुदत द्यावी अशी मागणी नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष दत्ता अनारसे, दिलीप अनर्थे, विष्णू वखरे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मेल्ट्रॉन कोविड सेंटरमधून घाटीत नेतांना ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू..? प्रशासनाचा इन्कार
- दम मारो दम! शहरात ४७ किलो कॅनबीस जप्त, नाका बंदीवर फक्त विचारपूस ?
- जिंतूरात लसींचा साठा कमी, नियोजनाचा अभाव, नागरिकांची तोबा गर्दी !
- केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रेमडेसिवीरवरील सीमाशुल्क केले माफ
- ठाकरे सरकारला वाजे सारख्या वसूली अधिकाऱ्यांची गरज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

