नवी दिल्ली- देशभरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर या इंजेक्शनला देशभरात प्रचंड मागणी आहे. अनेक ठिकाणी रेमडेसिवीर उपलब्ध नाहीत. ही बाब लक्षात घेऊन सरकारने रेमडेसिवीरसाठी लागणार्या कच्च्या मालावरील सीमाशुल्क माफ केले आहे.
दरम्यान, भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट खूपच भयावह रूप घेऊन आली आहे. दररोज कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. वाढत्या रुग्ण संख्येसोबतच रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर औषधाचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी देशभरातील विविध ठिकाणी रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
Considering the immediate requirement on the recommendation of the Department of Pharmaceuticals, the Department of Revenue has waived customs duty on #Remdesivir and its API/KSM. This step will further augment domestic availability of Remdesivir injection.
@PIB_India pic.twitter.com/Pk5t2OfCuY
— Sadananda Gowda (@DVSadanandGowda) April 21, 2021
औषधनिर्माण विभागाच्या शिफारशीनुसार, तातडीची गरज लक्षात घेऊन महसूल विभागाने रेमडेसिवीर इंजेक्शन आणि त्याच्या एपीआय / केएसएमवरील सीमा शुल्क माफ केले आहे, अशी माहिती केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. या निर्णयामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची देशांतर्गत उपलब्धता वाढेल असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- जिल्हांतर्गत तसेच जिल्ह्याबाहेरही एसटी सुरु राहतील, पण…; परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
- बीड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या धास्तीने बाजारपेठांत गर्दी; संचारबंदीचा नियम धाब्यावर
- शेतकरी कुटुंबातून आलेल्या अभिमन्यू काळेंची बदली अतिशय चुकीची; शिवसेना नेत्याचा घरचा आहेर
- गयावया करा, उधार घ्या किंवा डाका टाका पण ऑक्सिजनचा पुरवठा करा; उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
- ‘नानाजी, हवे तर प्रियांका गांधी यांचा सल्ला घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा हो’


